विराटला धडा शिकविण्यासाठी याने केला कोचपदासाठी अर्ज

 इंजिनिअर... म्हणजे फारूख इंजिनिअर नाही तर एका मॅकेनिकल इंजिनिअरने भारतीय टीमच्या कोच पदासाठी अर्ज केला आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 28, 2017, 01:51 PM IST
विराटला धडा शिकविण्यासाठी याने केला कोचपदासाठी अर्ज  title=

नवी दिल्ली :  इंजिनिअर... म्हणजे फारूख इंजिनिअर नाही तर एका मॅकेनिकल इंजिनिअरने भारतीय टीमच्या कोच पदासाठी अर्ज केला आहे. 

सोशल मीडियावर आता चित्रविचित्र प्रकार करून सहजासहजी चर्चेत येता येते. याचा हा प्रकार नाशिकच्या एका मॅकेनिकल इंजिनिअरने केला आहे. उपेंद्रनाथ ब्रह्मचारी असे याचे नाव असून विराटला धडा शिकविण्यासाठी आपण भारतीय टीमच्या कोच पदासाठी अर्ज केला असल्याचे त्याने सांगितले आहे. 

तीस वर्षीय ब्रह्मचारी याने बीसीसीआयच्या वेबसाइटला एक इमेल केला आहे. देशातील लाखो क्रिकेट प्रशंसकाप्रमाणे त्यालाही वाटते की अनिल कुंबळे यांना हटविण्यात कर्णधार विराट कोहली जबाबदार आहे. 

आपल्या हास्यास्पद सीव्हीमध्ये त्याने अनेक व्याकरणाच्या चुका केल्या आहेत. यात त्याने लिहिले की, महान क्रिकेटर अनिल कुंबळे यांच्या राजीनाम्यानंतर भारतीय क्रिकेट टीमच्या कोच पदासाठी अर्ज करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण मला वाटते की भारतीय टीमचा कर्णधार कोहलीला कोच म्हणून महान खेळाडू नाही पाहिजे. 

तो याच ठिकाणी थांबला नाही. त्याने लिहिले की, सीएसीने कोणत्याही माजी क्रिकेटरला कोच म्हणून निवड केली तरी, त्याचाही अपमान विराट कोहली याच प्रकारे करेल आणि परिणाम अनिल कुंबळे सारखा होईल. 

त्याने याचे कारण स्पष्ट करताना सांगितले की, मी अभिमानी स्वभावाच्या व्यक्तीशी सामंजस्य करू शकतो, असे कोणताही महान खेळाडू करू शकत नाही. हळूहळू मी त्या ठिकाण्यावर आणेल. त्यानंतर बीसीसीआय एखाद्या महान खेळाडूला कोच म्हणून नियुक्ती करू शकतो.