जमलं हो जमलं! IND vs NED सामन्यात तरुणानं केलं प्रपोज अन् सर्वांसमोर...पाहा Video

IND vs NED T20 World Cup 2022: भारताची फलंदाजी संपल्यानंतर नेदरलँडचा फलंदाजी सुरू होती. नेदरलँडच्या 7 व्या ओव्हरवेळी अचानक स्क्रिनवर एक कपल झळकू लागलं. त्यावेळी...

Updated: Oct 27, 2022, 05:44 PM IST
जमलं हो जमलं! IND vs NED सामन्यात तरुणानं केलं प्रपोज अन् सर्वांसमोर...पाहा Video title=
Marriage proposal during IND vs NED

Marriage proposal During IND vs NED Match : भारत आणि नेदरलँड (India vs netherlands) यांच्याच झालेल्या सामन्यात टीम इंडियाने (Team India) दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानला लोळवल्यानंतर आता भारताने नेदरलँडविरुद्ध एकहाती विजय मिळवला आहे. त्यामुळे आता भारताचं सेमिफायनलला पोहोचण्याचं गणित आणखी सोपं होत चाललंय. या सामन्यात भारताचे दोन स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि सुर्यकुमारने  (Suryakumar Yadav) धुवांधार फटकेबाजी करत भारताला 179 धावांवर पोहोचवलं. त्यानंतर सिडनीच्या (SCG) मैदानावर भारतीय गोलंदाजांची धार पहायला मिळाली.

सामना भलेही भारताने जिंकला असला आणि विराट सुर्याचं कौतूक होत असेल.. मात्र, सोशल मीडियाचं मैदान स्टेडियमवरच्या कपलने मारलं आहे. लाईव्ह सामन्यात (Live Match) एक लक्षवेधी घटना घडली. भारताची फलंदाजी संपल्यानंतर नेदरलँडचा फलंदाजी सुरू होती. नेदरलँडच्या 7 व्या ओव्हरवेळी अचानक स्क्रिनवर एक कपल झळकू लागलं. त्यावेळी (India couple Marriage proposal at SCG) एका तरूणाने त्याच्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलं आणि लग्न करणार का? असा प्रश्न विचारला.

तरुणाने प्रेयसीला अंगठी देत लग्नाची मागणी केली. त्यानंतर (Marriage proposal during T20 World Cup 2022 match) शेजारी बसलेल्या तरुणीने देखील विलंब न करता लगेच होकार कळवला. आयसीसी आणि टी-20 वर्ल्ड कपच्या अधिकृत अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी या व्हिडीओवर भन्नाट कमेंट केल्या आहेत. भावानं मैदान मारलं, अशी कमेंट एका युझरने केली आहे.

पाहा Video -

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

दरम्यान, दक्षिण आफ्रिका (SA) आणि झिम्बाब्वे (ZIM) यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला होता. यानंतर गट-2 संघांनी सेमीफायनल (SemiFinal) गाठण्याचं समीकरण खूपच रंजक बनलंय. त्यामुळे आता सेमीफायनलचं गणित आणखी कढीण झालं आहे. पावसामुळे सामन्याचं समिकरण कधी बदलेल सांगता येत नाही. त्यामुळे आता रोहितसेना पुर्ण तयारीनिशी मैदानात उतरताना दिसत आहे.