मारिया शारापोव्हाचं आव्हान धक्कादायकरित्या संपुष्टात

मुगुरुझानं कमालीचं वर्चस्व राखत केवळ ७० मिनिटांमध्ये शारापोव्हाला पराभूत केलं.

Updated: Jun 7, 2018, 04:17 PM IST
मारिया शारापोव्हाचं आव्हान धक्कादायकरित्या संपुष्टात title=

मुंबई : रशियाची स्टार खेळाडू मारिया शारापोव्हाचं फ्रेंच ओपनमधील आव्हान धक्कादायकरित्या संपुष्टात आलंय. स्पेनच्या गर्बाइन मुगुरुझा हिनं शारापोव्हावर ६-२, ६-१ अशा सरळ सेटमध्ये धमाकेदार विजयाची नोंद केली. या विजयासह मुगुरुझानं फ्रेंच ओपनची उपांत्या फेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व सामन्याआधी काही मिनिटं अगोदर दुखापतीमुळे सेरेना विलियम्सननं शारापोव्हाविरुद्ध सामन्यातून माघार घेतल्यानंतर यावेळी शारापोव्हाला मोठ्या कालावधीनंतर ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्याची संधी होती. मात्र, मुगुरुझाविरुद्ध ती आव्हानही निर्माण करु शकली नाही. मुगुरुझानं कमालीचं वर्चस्व राखत केवळ ७० मिनिटांमध्ये शारापोव्हाला पराभूत केलं.