Paris Olympics 2024 : भारताची नेमबाजपट्टू मनू भाकर हिने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल नेमबाजीत कांस्यपदकाला (Manu Bhaker Wins bronze) जिंकल्यानंतर अजून एका पदकाची कमाई केलीय. मनू भाकेर आणि सरबज्योत सिंग यांनी 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत दक्षिण कोरियाला पराभूत करताना पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचं दुसरं पदक जिंकलंय.
BRONZE!
Team India with Manu Bhaker and Sarabjot Singh clinch the #bronze medal in shooting mixed team 10m air pistol. It's India's first medal ever in this event.@IndianOlympians | @ISSF_Shooting | #ShootingSport | #Paris2024 | #Samsung | #TogetherForTomorrow pic.twitter.com/0SqYqtQJbH
— The Olympic Games (@Olympics) July 30, 2024
अंतिम फेरीत, भाकेर आणि सरबज्योत यांनी वोंहो ली आणि ये जिन ओह यांचा 16-10 असा पराभव केला. भारतीय जोडीने एका क्षणी 10-4 ने आघाडी घेतली आणि 10 शॉट्सच्या मालिकेनंतर 14-6 असा मोठा फरक निर्माण केला.
कोरियन जोडीने सलग मालिका जिंकून बाउन्स बॅक केलं आणि सामना सुरु ठेवला मात्र सर्व काही अपरिहार्यपणे लांबणीवर टाकलं. 13व्या मालिकेत भारताने कोरियाच्या 18.5 च्या तुलनेत 19.6 गुण मिळवलं आणि पदकावर आपलं नाव कोरलं.
MANU BHAKER HAS CREATED HISTORY
First Indian in Independent India history to win multiple medals at a single Olympic edition pic.twitter.com/r7RooX5Uac
— The Khel India (@TheKhelIndia) July 30, 2024
भाकर आणि सरबज्योत 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक ब्राँझ मेडल मॅचसाठी पात्रतामध्ये 580 गुणांसह तिसरं स्थान मिळवून पात्र ठरले होतं. जर त्यांनी आणखी एक गुण मिळवला असता तर ते सुवर्णपदकाच्या सामन्यात त्यांनी प्रवेश केला असता.
SARABJOT WE ARE SO PROUD OF YOU TOO pic.twitter.com/ZQq1ExY1ed
— The Khel India (@TheKhelIndia) July 30, 2024
मनु भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचलाय. एकाच ऑलिम्पिकमध्ये दुसरं पदकं जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरलीय. रविवारी मनू भाकरने 10 मीटर पिस्तुल नेमबाजीत कांस्यपदक जिंकल होतं. त्यानंतर आज मंगळवारी तिने 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक ब्राँझ मेडल जिंकून भारतीयांची मान उंचावलीय. दरम्यान मनू भाकरची 2 ऑगस्टला 25 मीटर पिस्तूल स्पर्धा असणार आहे.