Indian Team: 'या' स्टार खेळाडूसाठी टीम इंडियाचे दरवाजे कायमचे बंद?

रोहितच्या राज्यात या स्टार खेळाडूला टीम इंडियात संधी मिळेल असं तुम्हाला वाटतं का?

Updated: Jun 18, 2022, 01:36 PM IST
Indian Team:  'या' स्टार खेळाडूसाठी टीम इंडियाचे दरवाजे कायमचे बंद? title=

मुंबई : टीम इंडियाकडून खेळायला मिळावं हे स्वप्न प्रत्येक खेळाडूचं असतं. पण फार कमी खेळाडूंना ही संधी मिळते. टीम इंडियात स्थान मिळवणं हे खूप अवघड आहेच पण ते स्थान टिकवून ठेवणं त्याहीपेक्षा कठीण आहे. टीम इंडियाचा एक स्टार क्रिकेटर नेमकं हेच करू शकला नाही. त्यामुळे त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. आता त्याला टीम इंडियात परतणं कठीण झालं आहे. त्याच्या फ्लॉप शोमुळे त्याला मोठा फटका बसला आहे. 

मनीष पांडे एकेकाळी टीम इंडियाचे भविष्य मानलं जात होतं. मात्र त्याच्या खराब फॉर्ममुळे तो निवडकर्त्यांच्या डोळ्यात धूळफेक करू लागला आणि त्याला टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. 

मनीष पांडे देशांतर्गत क्रिकेटमध्येही कमाल दाखवू शकलेला नाही. गेल्या दोन वर्षांपासून तो टीम इंडियातून बाहेर आहे. त्याच्या जागी आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या अनेक युवा क्रिकेटपटूंना खेळण्याची संधी देण्यात आली. त्यामुळे मनीषचं टीम इंडियातील स्थान डळमळीत झालं.

आयपीएलमध्ये युवा खेळाडूंनी दमदार कामगिरी दाखवली. त्यामुळे त्यांना टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली. मनीष पांडेला आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करण्याची संधी होती. मात्र त्याला काही विशेष कामगिरी करता आली नाही. लखनऊ टीमने मनीषला 4.6 कोटी रुपये देऊन टीममध्ये घेतलं. मात्र आयपीएलमध्ये 6 सामने खेळून जेमतेम 88 धावा काढता आल्या. 

मनीष पांडे 32 वर्षांचा झाला आहे. वाढत्या वयासोबत त्याची कामगिरी कमी होत असल्याचं दिसत आहे. सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा सारखे युवा खेळाडू उत्तम कामगिरी करत असल्याने त्यांना टीम इंडियात संधी दिली जात आहे. आयुष बदोनी आणि टिळक वर्मासारख्या युवा खेळाडूंमुळे मनीष पांडेचं करिअर धोक्यात आलं आहे. 

करिअर संपल्यात जमा
मनीष पांडेने टीम इंडियाकडून 39 टी 20 सामने खेळले ज्यामध्ये त्याने 709 धावा केल्या. तर 39 वन डे सामन्यात 566 धावा करता आल्या. त्याची कामगिरी विशेष राहिली नाही. त्यामुळे त्याला टीम इंडिया पुढे स्थान मिळालं नाही. आता टीम इंडियात पुन्हा संधी मिळणंही कठीण झालं आहे. त्यामुळे जवळपास करिअर संपल्यात जमा असल्याची चर्चा आहे.