आयपीएलमध्ये बोली न लागलेला मलिंगा मुंबई इंडियन्सकडेच पण...

आयपीएलच्या अकराव्या सीझनआधी नुकताच खेळाडूंचा लिलाव पार पडला.

Updated: Feb 7, 2018, 09:20 PM IST
आयपीएलमध्ये बोली न लागलेला मलिंगा मुंबई इंडियन्सकडेच पण...  title=

मुंबई : आयपीएलच्या अकराव्या सीझनआधी नुकताच खेळाडूंचा लिलाव पार पडला. या लिलावामध्ये आयपीएल इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या लसीथ मलिंगावर कोणीच बोली लावली नाही. याआधी लसिथ मलिंगा मुंबई इंडियन्सकडून खेळला. आता मलिंगावर मुंबई इंडियन्सनं नवीन जबाबदारी टाकली आहे.

मलिंगाची मुंबई इंडियन्सचा बॉलिंग सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. महेला जयवर्धने मुंबईचा मुख्य प्रशिक्षक, रॉबिन सिंग बॅटिंग प्रशिक्षक, शेन बॉण्ड बॉलिंग प्रशिक्षक आणि जेम्स पेमेण्ट फिल्डिंग प्रशिक्षक आहे. प्रशिक्षकांच्या या टीममध्ये आता मलिंगाचीही भर पडली आहे.

मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये पुन्हा सहभागी व्हायला मिळाल्यामुळे मी आनंदी आहे. मागच्या १० वर्षांमध्ये मुंबई माझं दुसरं घर झालं होतं. नव्या आव्हानासाठी मी तयार आहे, अशी प्रतिक्रिया मलिंगानं दिली आहे.