IND vs AUS: अहमदाबादच्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या टीमचा ओपनर फलंदाज उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) उत्तम खेळी करत शतक झळकावलं आहे. या सामन्याचे दोन्ही दिवस ऑस्ट्रेलिया फलंदाजांच्या बाजूने चांगले राहिले. टेस्ट सामन्यात 5 सेशनपेक्षा अधिक वेळ फलंदाजी करताना त्याने 180 रन्स केले. दरम्यान सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याची विकेट कशी काढायची हा प्रश्न टीम इंडियासमोर होता. अशातच अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराच्या (Cheteshwar Pujara) एका निर्णयाने ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण खेळच पालटला.
ख्वाजाची विकेट काढण्यासाठी कर्णधार रोहित शर्माचा प्रत्येक डाव अपयशी ठरत होता. दरम्यान दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सेशनमध्ये चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) कर्णधारपदाची धुरा सांभाळत होता. यावेळी सेशन सुरु होताच पहिल्याच बॉलवर उस्मान ख्वाजा पव्हेलियनमध्ये परतला. पुजाराने संधी साधत DRS मागवला. दरम्यान याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
दुसऱ्या दिवशीच्या खेळामध्ये टीम इंडिया शेवटच्या सेशनमध्ये रोहित शर्मा मैदानात उतरला नव्हता. अशा परिस्थितीत कर्णधारपदाची धुरा चेतेश्वर पुजाराच्या खांद्यावर सोपवण्यात आली होती. कर्णधारपद मिळताच चेतेश्वर पुजाराने मोठी खेळी खेळली. यावेळी त्याने अक्षर पटेलला गोलंदाजी दिली. ख्वाजा 180 रन्सवर खेळत होता आणि अक्षरचा पहिलाच बॉल पॅडवर जाऊन लागला. टीम इंडियाच्या खेळाडूंना विकेटसाठी जोरदार अपील केलं. मात्र यावेळी अंपायर नितिन मेनन यांनी आऊट करार दिला नाही.
Pujju bhaiya ka camatkari review , fir king ki khushi to dekho pic.twitter.com/I9eg1xKSdf
— javed ansari (@javedan00643948) March 10, 2023
अक्षरचा बॉल पाहून चेतेश्वर पुजाराने क्षणाचाही विचार न करता DRS मागवला. ज्यामध्ये बॉल थेट विकेटवर जाऊन लागत असल्याचं दिसून आलं. अखेर यानंतर ख्वाजाला LBW आऊट करार देण्यात आला. नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत पुजाराच्या हुशारीने ही विकेट काढली. दरम्याचा या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरस होताना दिसतोय. यावेळी चाहते पुजारा कर्णधार बनवण्याची मागणी करताना दिसतायत.
Make Pujara DRS captain
— Mihir (@ImMihir05) March 10, 2023
चौथ्या सामन्याच्या पहिल्या दोन दिवशी ऑस्ट्रेलियन टीमचं वर्चस्व दिसून आलं. ऑस्ट्रेलियाच्या टीमने पहिल्या डावामध्ये 480 रन्स केले. कांगारूंच्या पहिल्या इंनिंगमध्ये उस्मान ख्वाजा आणि कॅमेरून ग्रीन यांनी शतकी खेळी खेळली. ख्वाजा 180 तर ग्रीन 114 रन्स करून पव्हेलियनमध्ये परतले. मुख्य म्हणजे या दोघांनी 5 व्या विकेटसाठी 208 रन्सची पार्टनरशिप केली.
टीम इंडियाकडून स्पिनर रविचंद्रन अश्विनने सर्वाधिक म्हणजेच 6 विकेट पटकावल्या. तर मोहम्मद शमीला 2 विकेट्स घेण्यात यश आलं आहे.