वर्ल्ड कप गाजवणाऱ्या महाराष्ट्राच्या कन्यांना मिळणार ५० लाखांचं बक्षीस

वर्ल्ड कपमध्ये दिमाखदार कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला संघावर बक्षिसांचा वर्षाव होत आहे.

Updated: Jul 29, 2017, 09:19 AM IST
वर्ल्ड कप गाजवणाऱ्या महाराष्ट्राच्या कन्यांना मिळणार ५० लाखांचं बक्षीस  title=

मुंबई : वर्ल्ड कपमध्ये दिमाखदार कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला संघावर बक्षिसांचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्र सरकारनंही या वर्ल्ड कपमध्ये खेळलेल्या तीन खेळाडूंना प्रत्येकी ५० लाख रुपयांचं इनाम द्यायची घोषणा केली आहे.

मोना मेश्राम, पूनम राऊत आणि स्मृती मानधना यांना महाराष्ट्र शासनाकडून ५० लाख रुपये देण्यात येणार आहेत. विधानसभेमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. यावेळी भारतीय संघाच्या अभिनंदनाचा ठराव विधानसभेमध्ये एकमतानं मंजूर करण्यात आला.

इंग्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या वर्ल्ड कपमध्ये भारतानं फायनल गाठली होती. फायनलमध्ये इंग्लंडनं भारताचा केवळ ९ रन्सनं पराभव केला होता.