M S Dhoni : टीम इंडियात धोनी परतणार, बीसीसीआयचा प्लॅन तयार

बीसीसीआय (Bcci) टीम इंडियात जीव ओतण्यासाठी मोठे बदल करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.    

Updated: Nov 15, 2022, 04:22 PM IST
M S Dhoni : टीम इंडियात धोनी परतणार, बीसीसीआयचा प्लॅन तयार title=

मुंबई  : टीम इंडियाचं (Indian Cricket Team) पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियन (World Cup 2022) होण्याचं स्वप्न भंगलं. इंग्लंडने 10 विकेट्सने पराभूत केल्यानं टीम इंडियाचा प्रवास सेमी फायनलमध्येच (Semi Final) संपला. या पराभवामुळे टीम इंडियाचा वर्ल्ड कप जिंकण्याची प्रतिक्षा आणखी लांबणीवर पडली. या पराभवानंतर बीसीसीआय (Bcci) एक्शन मोडमध्ये आली आहे. टीम इंडियाच बदलाचे वारे वाहू लागले आहेत. (m s dhoni may join team india squad as a coach for t 20 format bcci experiment)

टेलिग्राफच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआय टीम इंडियात जीव ओतण्यासाठी मोठे बदल करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. यानुसार हार्दिक पंड्याला टी 20 मध्ये कॅप्टन केलं जाऊ शकतं. तसंचं प्रत्येक फॉरमेटनुसार स्वतंत्र कॅप्टन-कोचची नियुक्ती केली जाऊ शकते, अशीही चर्चा आहे. 

बीसीसीआयची टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला संघासोबत जोण्यासाठी तयारी सुरु असल्याची चर्चा आहे. आयसीसीच्या स्पर्धेत कशाप्रकारे खेळायला हवं याबाबत जबाबदारी धोनीला देण्यात येऊ शकते.

धोनीची भूमिका काय असणार? 

धोनी 2021 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासोबत मेन्टॉर म्हणून होता. मात्र ती एका स्पर्धेची गोष्ट होती. त्यामुळे धोनीच्या मेन्टॉरपदी असल्याचा फारसा काही फरक जाणवला नाही. मात्र यंदा बीसीसीआय कायमस्वरुपी तोडगा काढत आहे, जेणेकरुन टीम इंडियाला धोनीचं मार्गदर्शन मिळेल. 

सूत्रांनुसार, धोनी 16 व्या मोसमानंतर (IPL 2023) आयपीएलला अलविदा करु शकतो. त्यानंतर धोनीकडे वेळ असेल. त्यामुळे बीसीसीआय धोनीला टी 20 फॉरमेटसाठी काम करण्याबाबत बोलू शकते.