IPL 2024: मंगळवारी झालेल्या सामन्यात लखनऊ सुपर जाएंट्सने रॉयल चॅलेंजर बंगळूरूचा पराभव केला. आरसीबीच्या होम ग्राऊंडवर 28 रन्सने टीमचा पराभव झाला. आरसीबीचा हा यंदाच्या सिझनमधील तिसरा पराभव होता. तर लखनऊचा हा सलग दुसरा विजय होता. लखनऊ सुपर जाएंट्सच्या या विजयामुळे आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर पहायला मिळाला आहे. यावेळी लखनऊ सुपर जाएंट्स पॉईंट्स टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे.
आरसीबीचा पराभव केल्याने लखनऊ सुपर जाएंट्सचे 3 सामन्यांमध्ये 4 पॉईंट्स झाले आहेत. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सची पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे. लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्सचे 4-4 गुण असले तरी केएल राहुलच्या टीमचा नेट रनरेट चांगला आहे.
संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स पहिल्या क्रमांकावर कायम आहे. राजस्थान रॉयल्सचे 3 सामन्यांत 6 गुण आहेत. यानंतर कोलकाता नाईट रायडर्स व्यतिरिक्त चेन्नई सुपर किंग्ज, गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्सचे प्रत्येकी 4 गुण आहेत. पण चांगल्या नेट रन रेटमुळे कोलकाता नाईट रायडर्स दुसऱ्या स्थानावर आहे. यानंतर तर चेन्नई सुपर किंग्ज तिसऱ्या स्थानावर आहे. सनरायझर्स हैदराबादची टीम एक सामना जिंकल्याने 3 सामन्यांत 2 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. यानंतर अनुक्रमे दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आहेत. या टीमचे 2-2 गुण समान आहेत.
बुधवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही टीम्स आमनेसामने येणार आहे. दोन्ही टीममधील सामना विशाखापट्टणमला होणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स विजय मिळवण्यात यशस्वी ठरला तर त्यांना पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान गाठण्याची संधी असणार आहे. दुसरीकडे या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने विजय मिळवल्यास पॉईंट्स टेबलमध्ये वर जाण्याची संधी असेल.