Rajat Patidar | रजत पाटीदारची तडाखेदार खेळी, लखनऊविरुद्ध शानदार शतक

रजत पाटीदारने (Rajat Patidar) लखनऊ (Lsg) विरुद्धच्या या सामन्यात झंझावाती शतक ठोकलंय.

Updated: May 25, 2022, 10:36 PM IST
Rajat Patidar | रजत पाटीदारची तडाखेदार खेळी, लखनऊविरुद्ध शानदार शतक title=

कोलकाता :  आरसीबीच्या (RCB) रजत पाटीदारने (Rajat Patidar) आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL Eliminator 2022) एलिमिनेटर सामन्यात शानदार कामगिरी केली आहे. रजतने लखनऊ (Lsg) विरुद्धच्या या सामन्यात झंझावाती शतक ठोकलंय. रजतने अवघ्या 49 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. रजतच्या आयपीएल कारकिर्दीतील हे पहिलंवहिलं शतक ठरलं. (lsg vs rcb ipl 2022 eliminator royal challengers banglore rajat patidar scored century against lucknow super giants at eden garden)

रजला शतकासाठी 6 धावांची गरज असताना त्याने खणखणीत सिक्स ठोकलं. रजतने या शतकी खेळीदरम्यान 6 गगनचुंबी सिक्स आणि 11 सिक्स ठोकले. रजत या शतकी खेळीसह आयपीएल प्लेऑफमध्ये शतक ठोकणारा अनकॅप्ड खेळाडू ठरला.

रजतने लखनऊच्या गोलंदाजांची पिसं काढली. रजतने मैदानात चौफेर फटकेबाजी केली.  रजतने 54 बॉलमध्ये 12 फोर आणि 7 सिक्ससह सर्वाधिक नाबाद 112 रन्स केल्या. रजतची ही खेळी त्याच्या आयपीएलमधील सर्वोच्च वैयक्तिक खेळी ठरली.

 

आरसीबीची प्लेइंग इलेव्हन : फाफ डुप्लेसी (कॅप्टन) विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरुर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शाहबाज अहमद, वानिंदु हसारंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि जॉश हेजलवुड.

लखनऊ सुपर जायंट्सचे शिलेदार : केएल राहुल (कॅप्टन), क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), एविन लुइस, दीपक हुड्डा, मनन वोहरा, मार्कस स्टोयनिस, क्रुणाल पंड्या, दुश्मंता चमीरा, आवेश खान, मोहसिन खान आणि रवी बिश्नोई