KKR vs RCB highlights, IPL 2024 : आरसीबीच्या पदरी पून्हा निराशा, केकेआरचा एक धावाने विजय

KKR vs RCB highlights, IPL 2024 : आयपीएलच्या 36 व्या सामन्यात आज कोलकाताच्या होमग्राउंडवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबत होत आहे.   

KKR vs RCB highlights, IPL 2024 : आरसीबीच्या पदरी पून्हा निराशा, केकेआरचा एक धावाने विजय

Kolkata Knhighr Riders vs Royal Challengers Bengaluru highlights​ in Marathi:आयपीएल 2024 मध्ये केकेआरचा संघ खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे, तर आरसीबी अजून आपली लय सापडवण्यात असमर्थ ठरली आहे. केकआर ही पॉइंट्स टेबलमध्ये 8 पॉइंट्स सोबत तिसऱ्या स्थानावर आहे, तर आरसीबी फक्त 2 पॉइंट्स सोबत 10 व्या स्थानावर आहे. तर आज आरसीबीला प्लेऑफच्या शर्यतीत रहायचं असेल तर आजचा सामना त्यांच्यासाठी महत्वाचा आहे.

21 Apr 2024, 19:48 वाजता

आयपीएलच्या 36 व्या सामन्यात केकेआरने, बंगळुरूला केवळ 1 धावाने पराभूत केलं आहे. मिचेल स्टार्कच्या शेवटच्या ओव्हरमध्ये, कर्ण शर्माने लगावलेले तीन षटकार बंगळुरूला विजयी रेखे  पर्यंत पोहोचवु शकले नाही. पॉइंट्स टेबलमध्ये, या विजयाने केकेआर ही 10 पॉइंटस सोबत दुसऱ्या स्थानावर कायम आहे. तर बंगळुरूचे प्लेऑफमध्ये क्लॉलिफाय करण्याची शक्यता आता फार कमी आहे. 

21 Apr 2024, 19:02 वाजता

15 ओव्हरनंतर आरसीबाचा स्कोर 174-6 असा आहे. आरसीबीच्या संघाच्या आणि फॅन्सच्या आशा आता दिनेश कार्तिकवर आहे. कार्तिक हा 5 धावांवर, तर प्रभूदेसाई हा 19 धावांवर खेळत आहे.

21 Apr 2024, 18:53 वाजता

सुनिल नरेन यानेसुद्धा आपल्या 13 व्या ओव्हरमध्ये आरसीबाच्या दोन फलदाजांना तंबूत परत पाठवलं आहे. ग्रीन हा 6 धावांवर, तर लोमरोर हा 4 धावांवर बाद झाला आहे.

21 Apr 2024, 18:47 वाजता

आंद्रे रसलच्या 12 व्या ओव्हरमध्ये बंगळुरूचे विल जॅक्स आणि पाटीदार ह्या दोन महत्वाच्या विकेट्स गेल्या आहेत. जॅक्स हा 55, तर पाटीदार हा 52 धावा बनवुन बाद झाला आहे.

21 Apr 2024, 18:42 वाजता

11 व्या ओव्हरमध्ये रजत पाटीदारने 21 बॉलमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. पण रसलच्या 12 व्या ओव्हरमध्ये लगेचच धडाकेबाज फलंदाजी करत असलेला फलंदाज विल जॅक्स हा आउट झाला आहे. 

21 Apr 2024, 18:34 वाजता

9 व्या ओव्हरमध्ये बंगळुरूचा धाकड ऑलराउंडर विल जॅक्स याने 29 बॉलमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. जॅक्सने आपल्या अर्धशतकीय इनिंगमध्ये 4 चौकार आणि 5 षटकार मारले आहेत. 10 ओव्हरच्या समाप्तीनंतर आरसीबीचा स्कोर 122-2 असा आहे.

21 Apr 2024, 18:13 वाजता

5 ओव्हरनंतर आरसीबीचा स्कोर आहे 52-2. बंगळुरूकडून विल जॅक्स हा 18 धावांवर, तर रजत पाटीदार हा 3 धावांवर खेळत आहे. या स्थितीतून आरसीबाला 90 बॉलमध्ये 171 धावांची गरज आहे.

21 Apr 2024, 18:07 वाजता

वरूण चक्रवर्तीने आपल्या इनिंगच्या पहिल्याच ओव्हरमध्ये बंगळुरूचा कॅप्टन फाफ डू प्लेसीला वेंकटेश अय्यरच्या एका उत्कृष्ट कॅचमुळे 7 धावावांर आउट केलं आहे. दुसऱ्या विकेटनंतर रजत पाटीदार हा फलंदाजीसाठी आला आहे.

21 Apr 2024, 17:59 वाजता

हर्षित राणाने तिसऱ्या ओव्हरमध्ये विराट कोहलीला 18 धावांवर आउट केलं आहे. पहिल्या विकेट नंतर विल जॅक्स हा फलंदाजीसाठी आला आहे. 

21 Apr 2024, 17:27 वाजता

20 ओव्हरमध्ये कोलकाताने आरसीबीसमोर 223 धावांचे आव्हान दिले आहे. केकेआरकडून कॅप्टन श्रेयस अय्यरने 50 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली आहे, तर बाकी फलंदाजीत फिलीप सॉल्टने 48, रिंकू सिंग 26 आणि रसल याने 27 धावांचे योगदान देत संघाला एका चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले आहे. आरसीबीकडून गोलंदाजीत फारसे चांगले प्रदर्शन राहिले नाही कॅमेरन ग्रीन आणि यश दयाल यांनी प्रत्यकी 2, तर मोहम्मद सिराज आणि लॉकी फर्ग्यूसन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतलेली आहे. 
आता बघण्यायोग्य गोष्ट असणार की, बंगळुरूचे फलंदाज 223 धावांचे आव्हान पार करणार कि नाही, कि केकेआर, बंगळुरूला आपल्या होमग्राउंडवर पराभूत करणार?