Video Viral : मोठ्या मनाचा रोहित! मैदानात धावून आलेल्या फॅनसाठी सिक्यूरीटीला केली विनंती

IND vs NZ 2nd ODI : रोहितला भेटण्यासाठी एक फॅन चालू सामन्यात मैदानात घुसल्याचं दिसलं. त्यावेळी रोहितने जे केलं त्यावर सारे फिदा झाले असून सोशल माध्यमांवर त्याचं कौतुक करत आहेत.

Updated: Jan 21, 2023, 07:20 PM IST
Video Viral : मोठ्या मनाचा रोहित! मैदानात धावून आलेल्या फॅनसाठी सिक्यूरीटीला केली विनंती title=

IND vs NZ 2nd ODI : भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये विजय मिळवला असून यंदाच्या वर्षी आपला सीरीज जिंकण्याचा विजयरथ कायम ठेवला आहे. दुसरा सामना (IND vs NZ 2nd ODI) भारताने जिंकला असून 2-0 ने मालिका खिशात घातली आहे. न्यूझीलंडच्या 108 धावांचा पाठलाग करताना मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाने मजबूत सुरूवात केली होती. रोहित शर्माने अर्धशतक ठोकत आपण फॉर्ममध्ये आल्याचे संकेत दिले. या सामन्यादरम्यान रोहितला भेटण्यासाठी एक फॅन चालू सामन्यात मैदानात घुसल्याचं दिसलं. त्यावेळी रोहितने जे केलं त्यावर सारे फिदा झाले असून सोशल माध्यमांवर त्याचं कौतुक करत आहेत. (little fan entered the ground to meet captain rohit sharma ind vs nz second ODI latets marathi sport news)

नेमकं काय झालं? 
रोहित शर्मा आणि शुभमन गिलने चांगली सुरूवात केली होती. रोहितने आक्रमक फलंदाजी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांना धारेवर धरलं होतं. रोहितने चौकार आणि षटकार ठोकत आक्रमक सुरूवात केली होती. सामन्याच्या 10 व्या षटकामध्ये रोहितने एक गगनचुंबी षटकार मारला होता यादरम्यान रोहितचा एक छोटासा चाहता सुरक्षा रक्षकांची नजर चुकवत मैदानात शिरला. 

लहानग्याने जाऊन थेट रोहित शर्माला मिठी मारली. रोहितने मोठ्या मनाने त्याला मिठी मारू दिली आणि जवळ घेतलं. सुरक्षारक्षक जोपर्यंत आले नाहीत तोपर्यंत त्याने चाहत्याला दूर केलं नाही. जेव्हा सुरक्षा रक्षक आले तेव्हा त्यांनी त्या मुलाला बाहेर घेऊन गेले. रोहितच्या या कृतीचं सोशल मीडियावर मोठ्या मनाने कौतुक करताना दिसत आहेत. 

दरम्यान,  भारताने आजच्या सामन्यात मोठा विजय मिळवला आहे. श्रीलंकेवर 317 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आता हा दुसरा मोठा विजय रोहित अँड कंपनीने मिळवला आहे. 

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

न्यूझीलंडचा संघ- फिन एलन, डेवोन कॉनवे, हेन्री निकोल्स, डेरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार), ग्लेन फिलीप्स, मायकेल ब्रासवेल, मिशे सँटनर, हेन्री शिप्ले, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर