Messi on Retirement : सर्वात रोमहर्षक आणि अखेरच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या फायनलमध्ये अर्जेटिंनानं थरारक विजय मिळवलाय.. फिफाच्या (FIFA World Cup Final 2022) अंतिम सामन्यात पेनल्टी शूट आऊटवर (Penalty shootout) अर्जेंटिनाने फ्रान्सवर 4-2 अशी मात केली... आणि 36 वर्षानंतर पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकून घेतलाय. अर्जेंटिनासाठी मेस्सी (Lionel Messi) आणि डी मारियाने पहिल्या हाफमध्ये दोन गोल करत विजयी आघाडी घेतली. अर्जेंटिनाने 4-2 (Argentina vs France) असा विजय साकारत तिस-यांदा वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं. मेस्सीचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न अखेर साकार झालं.
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. या वर्ल्डकपनंतर तो कधीही निवृत्त होऊ शकतो, अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यावर अखेर मेस्सीने मौन सोडलं आहे. आपल्या लाडक्या मेस्सीने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. (Lionel Messi says he will not retire from international football after captaining Argentina to a first World Cup trophy in 36 years)
LIONEL MESSI JUMPING ON THE TABLE IN THE DRESSING ROOM
(via @Notamendi30) pic.twitter.com/WUTq3AmjKs
— ESPN FC (@ESPNFC) December 18, 2022
विश्वचषक विजेतेपद जिंकल्यानंतर तो अर्जेंटिनातून निवृत्त होणार नाही. मेस्सीने TyC स्पोर्ट्सला सांगितले की, ''तो अर्जेंटिनासाठी आणखी काही काळ खेळत राहण्याचा मानस आहे." , मी अर्जेंटिना राष्ट्रीय संघातून निवृत्त होणार नाही. मला चॅम्पियन म्हणून खेळणे सुरू ठेवायचं आहे, आहे.