FIFA WorldCup 2022 च्या किताबांचे हे 4 चार महानायक, पाहा एका क्लिकवर!

अर्जेंटिनाने वर्ल्ड कपच नाहीतर मानाचे 'हे' तीन किताबही पटकावले

Updated: Dec 19, 2022, 02:05 AM IST
FIFA WorldCup 2022 च्या किताबांचे हे 4 चार महानायक, पाहा एका क्लिकवर! title=

FIFA WorldCup 2022 Full Award List : अर्जेंटिनाने फायनल सामन्यात फ्रान्सचा (FIFA WorldCup 2022)  पराभव करत थरारक विजय मिळवला. श्वास रोखून धरायला लावणाऱ्या सामन्यामध्ये अर्जेंटिनाचा विजय झाला पण  फ्रान्सनेही तितकीच कडवी झुंज दिली. (FIFA WorldCup 2022 Full Award List) सामना अगदी पेनल्टी शूटआऊटपर्यंत गेला होता मात्र त्यावेळी फ्रान्सच्या खेळाडूंची मेहनत अर्जेंटिनाच्या बरोबरीने कमी पडली. अखेर पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिना 4-2 ने विजय मिळवला. यंदाच्या वर्ल्डकपमधील महत्त्वाचे पुरस्कार देण्यात आले. सर्व पुरस्कारांची यादी पुढे देण्यात आली आहे.  

गोल्डन बूट  (FIFA World Cup Winner 2022 Golden Shoe)
गोल्डन बूट हा पुरस्कार वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला दिला जातो. यावेळी लिओनल मेस्सी आणि एम्बाप्पेने यांच्यामध्ये मोठी स्पर्धी होती. कारण दोघांचेही 5 -5 गोल होते. त्यामुळे दोघांनाही अंतिम सामन्यामध्ये बूट मिळवण्याची समान संधी होती. मात्र यामध्ये एम्बाप्पेने बाजी मारली. एम्बाप्पेने 3 गोल करत एकूण या वर्ल्डकपमध्ये 8 गोल केले. मेस्सी 7 गोलसह दुसऱ्या स्थानावर राहिला. 

गोल्डन ग्लब्ज पुरस्कार (FIFA World Cup Winner 2022 Golden Glove)
गोल्डन ग्लब्ज हा पुरस्कार वर्ल्ड कपमधील सर्वोत्तम गोलरक्षकाला म्हणजे Goalkeeper ला दिला जातो. मोरोक्कोचा यासिन बौनो, क्रोएशियाचा डॉमिनिक लिव्हकोविक आणि अर्जेंटिनाचा एमिलियानो मार्टिनेझ हे विजेतेपदाच्या शर्यतीत होते. अर्जेंटिनाचा 30 वर्षीय एमिलियानो मार्टिनेझला या वर्ल कपमध्ये गोल्डन ग्लब्ज पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. अर्जेंटिनाच्या विजयात त्याचं मोलाचं योगदान राहिलं. 

गोल्डन बॉल पुरस्कार (FIFA World Cup Winner 2022 Golden Ball Award)
गोल्डन बॉल हा पुरस्कार वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूला दिला जातो. त्यामुळे हा पुरस्कार मेस्सीलाच मिळाला. या स्पर्धेत मेस्सीने आपली छाप उमटवली. फायनल सामन्यातही त्याने आपला संपूर्ण अुनभव पणाला लावत त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी केली. गोल्डन बॉल मिळवून मेस्सी हा पुरस्कार दोनदा मिळवणारा जगातील पहिला खेळाडू ठरला.

यंग प्लेअर (FIFA World Cup Winner 2022 Young Player)
अर्जेंटिनाच्या एन्झो फर्नांडीझने FIFA विश्वचषक 2022 चा ‘यंग प्लेयर’ पुरस्कार जिंकला. पेनल्टी शूटआऊटमध्ये फर्नांडीझने गोल करत  संघाला विजयी आघाडी मिळवून दिली.