FIFA World Cup 2022 Final : अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने (Argentina vs France) पेनाल्टी शूटआऊटवर 4-2 असा विजय मिळवत तब्बल 36 वर्षांनी वर्ल्ड कपवर नाव कोरलं. मॅजिकल मेस्सीने (Lionel Messi) एक्स्ट्रा टाईममध्ये गोल नोंदवत एमबाप्पेच्या (Kylian Mbappe) पराक्रमाला सुरंग लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखेर पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने थरारक विजय (Thriller Win) मिळवला. अशातच आता विचित्र योगायोग समोर आल्याचं पहायला मिळतंय. (Lionel Messi PSG connection in FIFA World Cup 2022 Final 339 crore deal Argentina vs France marathi news)
लिओनेल मेस्सी फिफा वर्ल्ड कप जिंकणार हे 494 दिवसांपूर्वीच ठरलं होतं, अशी चर्चा होताना दिसत आहे. तर काहींनी फायनलआधीच मेस्सीच्या नावावर वर्ल्ड कपचा ठसा उमटवला होता. त्याला कारण होतं...एक डील. या डीलच्या माध्यमातून मेस्सीला वर्षाला 339 कोटी रुपये मिळणार आहेत. त्यामुळे आता ही डील नेमकी कशाची? आणि मेस्सीने (Lionel Messi PSG connection) नेमकी कोणती डील केली?, असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे.
फिफा वर्ल्ड कप 2022 च्या फायनल सामन्याच्या 494 दिवसांपूर्वी मेस्सीने फ्रान्सचा क्लब असलेल्या पेरिस सेंट जर्मेनसोबत (Paris Saint Germain Football Club) म्हणजेच PSG सोबत दोन वर्षांचा करार केला. हा करार 11 ऑगस्ट 2021 रोजी करण्यात आला होता. हा करार झाल्यानंतर मेस्सी वर्ल्ड कप मारणार हे निश्चित झालं होतं. योगायोग असा आहे की, जो खेळाडू PSG क्लबसोबत डील (Lionel Messi PSG Deal) करतो, तो खेळाडू वर्ल्ड कप जिंकून देतो. त्यामुळे यंदा मेस्सीची जादू चालली, असं बोललं जात आहे.
आणखी वाचा - Lionel Messi : 'मेस्सीचा जन्म आसाममध्ये झाला', काँग्रेस खासदाराचा जावईशोध!
दरम्यान, 2017 मध्ये या क्लबने एम्बाप्पेला (Mbappe) करारबद्ध केलं होतं, त्यानंतर 2018 मध्ये एम्बाप्पेने फ्रान्सला विश्वविजेता बनवलं. त्याआधी 2001 साली ज्यावेळी PSGने ब्राझिलियन खेळाडू रोनाल्डोसोबत (Ronaldo) करार केला होता. त्यानंतर 2002 मध्ये ब्राझीलने (Brazil) वर्ल्ड कप पटकावला होता. त्यानंतर सध्या सोशल मीडियावर या विचित्र योगायोगाची चर्चा आहे.