VIDEO: बॅटिंग, बॉलिंग सोडून क्रिकेटच्या मैदानात कबुतर जा, जा, जा...; व्हिडीओ पाहून तुम्हीही हसाल

AUS vs PAK 2nd Test, Marbus Labuschagne Video : लाबुशेन फलंदाजी करत असताना अचानक तो कबुतरांच्या मागे बॅट घेऊन धावताना दिसला. फलंदाजी सुरु असताना कबुतरांनी खेळाडूंना काहीसा त्रास दिला. 

सुरभि जगदीश | Updated: Dec 27, 2023, 10:52 AM IST
VIDEO: बॅटिंग, बॉलिंग सोडून क्रिकेटच्या मैदानात कबुतर जा, जा, जा...; व्हिडीओ पाहून तुम्हीही हसाल title=

AUS vs PAK 2nd Test, Marbus Labuschagne Video : क्रिकेटच्या मैदानावर अनेक विचित्र गोष्टी घडलेल्या तुम्ही पाहिल्या असतील. यामध्ये कधी ग्राऊंडमध्ये सापाची एन्ट्री होते, कधी कुत्रा येतो तर कधी मधमाश्यांचा हल्ला होताना दिसतो. अशीच एक घटना ऑस्ट्लिया विरूद्ध पाकिस्तान यांच्या सामन्यादरम्यान घडताना दिसली. यावेळी परिस्थिती अशी उद्भवली की, खेळाडूंना अखेरी कबुतरांना हाकलावं लागलं. 

ऑस्ट्रेलिया विरूद्ध पाकिस्तान यांच्यात सध्या टेस्ट सामना सुरु आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर दोघांमध्ये सामना सुरु असून यावेळी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबुशेन एका वेगळ्याच आणि हटके अंदाजात दिसला. फलंदाजी करत असताना अचानक लाबुशेन ( Marnus Labuschagne ) बॅट घेऊन चक्क कबुतरांच्या मागे धावताना दिसला. लाबुशेनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. 

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या टेस्ट सामन्याच्या (PAK vs AUS ) पहिल्या दिवशी पावसाने व्यत्यय आणला. पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं. ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी 3 विकेट्स गमावून 187 रन्स केले. झालं असं की, 3व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला मार्नस लॅबुशेनन क्रीजवर होता, त्याने 120 बॉल्समध्ये 44 रन्स केलेत.

लाबुशेन फलंदाजी करत असताना अचानक तो कबुतरांच्या मागे बॅट घेऊन धावताना दिसला. फलंदाजी सुरु असताना कबुतरांनी खेळाडूंना काहीसा त्रास दिला. यानंतर लाबुशेनने हे कृत्य केलं. कबुतरांना उडवल्यानंतर त्यांचा थवा काहीसाच दूर जाऊन बसला. लाबुशेनची ही तारेवरची कसरत पाहून स्टिव्ह स्मिथला देखील हसू आवरलं नाही.

ख्वाजा आणि वॉर्नरची उत्तम सुरुवात

टॉस हरल्यानंतर ऑस्ट्रेलियन टीम फलंदाजीला आली आणि उस्मान ख्वाजा आणि डेव्हिड वॉर्नरने या सामन्यात चांगली सुरुवात केली. दोघांनी मिळून 95 रन्सची सलामी दिली. ख्वाजाने 101 बॉल्समध्ये 5 फोर्सच्या मदतीने 42 रन्स केले तर डेव्हिड वॉर्नरने 83 बॉल्समध्ये 38 रन्स केल्या. टीमच्या 108 रन्सपर्यंत दोन्ही ओपनर माघारी परतले.