टीम इंडियामध्ये घुसला कोरोना, दुसरीकडे श्रीलंका टीममध्ये एका खेळाडूची ही अडचण

भारत विरुद्ध इंग्लंड सीरिजआधी कोरोनाचं संकट पुन्हा डोक वर काढत आहे. भारतीय संघात कोरोनानं शिरकाल केला आहे

Updated: Jul 15, 2021, 04:17 PM IST
टीम इंडियामध्ये घुसला कोरोना, दुसरीकडे श्रीलंका टीममध्ये एका खेळाडूची ही अडचण title=

मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड सीरिजआधी कोरोनाचं संकट पुन्हा डोक वर काढत आहे. भारतीय संघात कोरोनानं शिरकाल केला आहे. टीम इंडियाचा खेळाडू ऋषभ पंतला कोरोनाची लागण झाल्यानं चिंता वाढली आहे. तर दुसरीकडे टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका सीरिज होणार आहे. या सीरिजआधी एक खेळाडू जखमी झाला आहे. 

टीम इंडिया विरुद्ध वन डे सीरिजमध्ये श्रीलंका क्रिकेट टीमचं टेन्शन वाढलं आहे. याचं कारण म्हणजे आधी फलंदाज कोच आणि खेळाडूला कोरोनाची लागण झाली. त्यातून सावरत असताना पुन्हा एकदा श्रीलंकेचा खेळाडू सरावा दरम्यान जखमी झाला आहे. विस्फोटक फलंदाजाच्या खांद्याला सरावा दरम्यान दुखापत झाली आहे. 

भारत विरुद्ध श्रीलंका पहिला वन डे सामना  18 जुलैला खेळवला जाणार आहे. या सामन्याआधी कुशल परेरा जखमी झाला आहे. त्यामुळे तो सीरिज बाहेर जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे श्रीलंका टीमच्या मागचं शुल्ककाष्ट थांबण्याचं नाव घेत नाही.

टीम इंडियावर कोरोनाचं संकट

टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. 4 ऑगस्टपासून भारत विरुद्ध इंग्लंड 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.  इंग्लंडमध्ये कोरोनाचं संक्रमण वाढत असताना त्याचा फटका आता टीम इंडियालाही बसला आहे. टीम इंडियाचा विकेटकीपर ऋषभ पंत याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. सध्या 

ऋषभ पंत इंग्लंडमध्ये त्याच्या नातेवाईकांकडे क्वारंटाईन झाला आहे. काही दिवसांपूर्वी ऋषभ पंत युरो कपची मॅच पाहण्यासाठी गेला होता. इंग्लंड विरूद्ध जर्मनीची मॅच पाहण्यासाठी पंत लंडनच्या वेम्बले स्टेडियममध्ये गेला होता. यावेळी त्याने सोशल मीडियावर फोटोही शेअर केले होते. विनामास्क फोटो काढल्यामुळे पंतला ट्रोल देखील करण्यात आलं होतं.