मित्र असावा तर असा! 'पर्पल कॅप जिंकवी तर....' कुलदीप यादवने सांगितली मनातली गोष्ट

तेरी मेरी यारीया! कुलदीप यादवचं खेळापेक्षाही मित्रावर जास्त प्रेम, 'पर्पल कॅप जिंकवी तर....' 

Updated: Apr 29, 2022, 11:21 AM IST
मित्र असावा तर असा! 'पर्पल कॅप जिंकवी तर....' कुलदीप यादवने सांगितली मनातली गोष्ट title=

मुंबई : दिल्ली टीमने कोलकाताला मैदानात धूळ चारत 4 विकेट्सने सामना जिंकला. कुलदीपने कोलकाता विरुद्ध उत्तम गोलंदाजी केली. कुलदीपने 3 ओव्हरमध्ये 14 धावा देऊन 4 विकेट्स काढल्या. 

कोलकाता विरुद्ध दिल्ली झालेल्या सामन्यानंतर कुलदीप यादवने आपली प्रतिक्रिया दिली. कुलदीप यादवने यावेळी युजवेंद्र चहल सख्खा मित्र जिगरी दोस्त असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलं. 

माझ्यात आणि युजवेंद्रमध्ये कोणतीच स्पर्धा नाही. त्याने मला खूप प्रोत्साहित केलं. तो मला माझ्या मोठ्या भावासारखा आहे. चहलने पर्पल कॅप जिंकावी असं मला मनापासून वाटतं. गेल्या 4 वर्षांत त्याने सर्वोत्तम बॉलिंग केली आहे. 

अपयशाला आता मी घाबरत नाही असं कुलदीप यादव म्हणाला. कुलदीपला दिल्ली विरुद्धच्या सामन्यात मॅन ऑफ मॅच पुरस्कार देण्यात आला. आता मी मानसिक आणि शारीरिक दोन्ही दृष्टीनं अधिक कणखर बनलो आहे. मला अपयशाची कोणतीही भीती वाटत नाही असं कुलदीप म्हणाला. 

आयपीएल कुलदीपसाठी खूप फायद्याचं ठरलं आहे. कुलदीपला पुन्हा टीम इंडियाचे दरवाजे खुले होऊ शकतात. त्याची कामगिरी उत्तम राहिली आहे. कोलकाता विरुद्धच्या सामन्यात त्याने 3 ओव्हरमध्ये 4 विकेट्स घेतल्या.