मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये विराटनं केला रेकॉर्ड, पोहोचला पहिल्या क्रमांकावर

आयपीएलच्या अकराव्या मोसमातल्या ३१व्या मॅचमध्ये बंगळुरूनं मुंबईचा १४ रननी पराभव केला.

Updated: May 2, 2018, 09:52 PM IST
मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये विराटनं केला रेकॉर्ड, पोहोचला पहिल्या क्रमांकावर  title=

बंगळुरू : आयपीएलच्या अकराव्या मोसमातल्या ३१व्या मॅचमध्ये बंगळुरूनं मुंबईचा १४ रननी पराभव केला. या मॅचमध्ये पहिले बॅटिंग करणाऱ्या बंगळुरूनं ७ विकेट गमावून १६७ रन केले. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला २० ओव्हरमध्ये १५३ रन बनवता आले. बंगळुरूचा ८ मॅचमधला हा तिसरा विजय आहे. पॉईंट्स टेबलमध्ये बंगळुरू ६ पॉईंट्ससह पाचव्या क्रमांकावर पोहोचली आहे. तर मुंबईचा ८ मॅचमधला हा सहावा पराभव आहे. या मॅचमध्ये बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीनं मोठी खेळी केली नाही तरी आयपीएलमधली काही रेकॉर्ड विराटनं या मॅचमध्ये केली. विराट आणि रैनामध्ये या आयपीएलमध्ये स्पर्धा सुरु आहे. आता पुन्हा एकदा विराटनं रैनाला मागे टाकलं आहे. विराट हा आयपीएलमध्ये सर्वाधिक रन करणारा खेळाडू बनला आहे. विराटनं याआधी मुंबईविरुद्धच खेळताना रैनाचं रेकॉर्ड मोडलं होतं. त्या मॅचनंतर विराटच्या नावावर ४ शतकं आणि ३२ अर्धशतकं होती. १५३ मॅचमध्ये विराटनं ४,६१९ रन केले होते. यानंतर हैदराबादविरुद्धच्या मॅचमध्ये रैनानं ५३ रनची खेळी करून कोहलीला मागे टाकलं. या मॅचनंतर रैनानं १६५ मॅचच्या १६१ इनिंगमध्ये ४६५८ रन केले होते. यामध्ये ३२ अर्धशतकं आणि एका शतकाचा समावेश होता. मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये विराटनं पुन्हा रैनाचं रेकॉर्ड मोडलं.

मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये कोहलीनं एक सिक्स आणि दोन फोरच्या मदतीनं २६ बॉलमध्ये ३२ रन केले. या खेळीबरोबरच विराटनं आणखी एक रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केला. विराट आयपीएलच्या अकराव्या मोसमात धावून सर्वाधिक रन काढणारा खेळाडू बनला आहे. विराटनं या मोसमात ११३ रन धावून काढल्या आहेत. यानंतर अंबाती रायडूनं १०८, केन विलियमसन १०३, संजू सॅमसन ८४ आणि अजिंक्य रहाणेनं ८० रन धावून काढल्या.