विराटचा 'हा' निर्णय वैयक्तिक; कर्णधारपद सोडल्यानंतर सौरव गांगुली म्हणाले...

 कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

Updated: Jan 16, 2022, 09:25 AM IST
विराटचा 'हा' निर्णय वैयक्तिक; कर्णधारपद सोडल्यानंतर सौरव गांगुली म्हणाले... title=

मुंबई : विराट कोहलीने कसोटी कर्णधार म्हणून आपली कारकीर्द संपवण्याचा निर्णय घेतला आहे. विराटच्या या निर्णयाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. विराट कोहलीने शनिवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही घोषणा केली. दरम्यान कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

यासंदर्भात गांगुली यांनी ट्विट केलंय. ते म्हणतात की, "विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेटने खेळाच्या सर्व फॉरमॅटमध्ये चांगली प्रगती केली आहे. हा  त्याचा निर्णय वैयक्तिक आहे आणि बीसीसीआय त्याच्या निर्णयाचा खूप आदर करते. या टीमला भविष्यात नवीन उंचीवर नेण्यासाठी तो महत्त्वाचा सदस्य असेल. एक महान खेळाडू. खूप छान विराट."

विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर गांगुली यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिलीये. विराट कोहलीने वनडे टीमचं कर्णधारपद सोडलं तेव्हापासून गांगुली यांना विराटच्या चाहत्यांकडून टार्गेट केलं जात होतं.

विराट-बीसीसीआयमध्ये वाद?

विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी एका पत्रकार परिषदेत बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या विधानाचं खंडन केलं होतं.  त्याच्या म्हणण्याप्रमाणे, मला टी-20 टीमचं कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितलं गेलं नाही. मात्र यांनंतर मुख्य सिलेक्टर चेतन शर्मा यांनी मात्र कोहलीचं हे वक्तव्य फेटाळून लावलं होतं.

अचानक कर्णधारपद सोडण्याचा निर्णय

दक्षिण आफ्रिकेकडून मालिका 1-2 ने मालिका गमावल्यानंतर दुसऱ्या दिवशी विराट कोहलीने ट्विट केलं की, "प्रत्येकाला एका टप्प्यावर येऊन थांबावं लागतं आणि भारतीय कसोटी कर्णधार म्हणून माझ्यासाठी हाच टप्पा आहे. या प्रवासात अनेक चढउतार आले पण प्रयत्नांचा किंवा विश्वासाचा कधीच अभाव नाही राहिला.