मुंबई : अंडर 19 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करत चौथ्यांदा वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं आहे.
पृथ्वी शॉ: भारतीय अंडर-19 क्रिकेट टीमचा कर्णधार ठाण्याचा राहणारा आहे. पृथ्वी शॉने 2013 मध्ये 546 रन्सची खेळी केली होती. ज्यामुळे तो चर्चेत आला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या सामन्यात त्याने 94 रन केले होते.
शुभम गिल: शुभम गिल पंजाबच्या फजिल्काचा राहणारा आहे. अंडर 19 सोबतच पंजाब अंडर 16 आणि 19 सोबत त्य़ाने सामने खेळले आहेत. या वर्ल्ड कपमध्ये त्याने पाकिस्तानविरुद्ध 102 रन, बांग्लादेशविरुद्ध 86, जिम्बाब्वेविरुद्ध 90 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 63 केले.
आर्यन जुयल: आर्यन जुयल उत्तर प्रदेशच्या मुरादाबादचा राहणारा आहे. तो 16 वर्षांचा आहे. भारतीय विकेटकीपर आर्यनने वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी केली आहे.
अभिषेक शर्मा: अभिषेक अमृतसरचा राहणारा आहे. तो 17 वर्षाचा आहे. भारतीय टीमसोबतच तो पंजाबसाठी देखील क्रिकेट खेळतो. बॅटींग सोबतच त्याने बॉलिंगमध्ये देखील चांगली कामगिरी केली आहे.
अर्शदीप सिंह: अर्शदीप सिंह मध्यप्रदेशचा राहणारा आहे. तो 18 वर्षाचा आहे. अर्शदीपने या वर्ल्डकपमध्ये 3 विकेट घेतले आहेत.
हार्विक देसाई: हार्विक मनीषभाई देसाई गुजरातच्या भावनगरचा राहणारा आहे. हार्विक 18 वर्षाचा आहे. तो विकेटकीपर आणि बॅट्समन आहे. सौराष्ट्रासाठी त्याने अनेक सामने खेळले आहेत. 4 सामन्यांमध्ये त्याने चांगली कामगिरी केली.
मंजोत कालरा: दिल्लीचा राहणारा मंजोत कालरा 19 वर्षाचा आहे. तो दिल्लीकडून खेळतो. मंजोतने या वर्ल्डकपमध्ये सर्वात मोठी खेळी 86 रनची खेळली आहे. त्यानंतर फायनलमध्ये देखील त्याने शतक ठोकलं.
कमलेश नागरकोटी: कमलेश नागरकोटी राजस्थानच्या बाडमेरचा राहणारा आहे. तो 18 वर्षाचा आहे. नागरकोटीची आयपीएलमध्ये देखील निवड झाली आहे. या वर्ल्ड कपमध्ये त्याने 7 विकेट घेतले आहेत.
पंकज यादव: पंकज यादव झारखंड अंडर 19 टीममध्ये खेळतो. या वर्ल्ड कपमध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकच सामना खेळला.
रियान पराग: रियान पराग असममधील गुवाहाटीचा राहणारा आहे. तो आता 16 वर्षांचा आहे. भारताच्या टॉप ऑर्डर खेळाडूंमध्ये तो आहे. त्याने या वर्ल्डकपमध्ये चांगली बॉलिंग देखील केली आहे.
ईशान पोरेल: ईशान चंद्रनाथ पोरेल पश्चिम बंगालमधून खेळतो. तो 19 वर्षाचा आहे. त्याने 4 सामन्यांमध्ये 8 विकेट घेत या वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे.