U-19 वर्ल्डकप फायनलमध्ये भारताचा दणदणीत विजय

१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवत चौथ्यांदा वर्ल्जकपवर आपलं नाव कोरलं आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 3, 2018, 01:24 PM IST
U-19 वर्ल्डकप फायनलमध्ये भारताचा दणदणीत विजय title=

माउंट मौंगानुई : १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवत चौथ्यांदा वर्ल्जकपवर आपलं नाव कोरलं आहे.

भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीलाच कांगारुंना दणका देत सामन्यावर पकड मजबूत केली होती. ऑस्ट्रेलियाच्या झटपट विकेट घेण्यात भारतीय टीमला यश आलं. ऑस्ट्रेलियन टीम 216 रनवर ऑलआऊट झाली.

भारताला दूसरा झटका 131 रन्सवर लागला. शुभमान गिल 31 वर आऊट झाला. परम उप्पलने त्याला बोल्ड केलं. याआधी 71 रनच्या स्कोरवर भारताचा कर्णधार पृथ्वी शॉ 29 रनवर आऊट झाला. त्यानंतर भारताच्या मनजोत कालराने जबरदस्त खेळी करत भारताला विजयाच्या दिशेने पुढे नेण्यात जबरदस्त कामगिरी केली.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात भारतीय टीम फेव्हरेट मानली जात होती. जर भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला कर भारत चौथ्यांदा वर्ल्डकप जिंकणारा संघ ठरणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार पृथ्वी शॉ देखील ही संधी जाऊ देणार नाही. कर्णधार पृथ्वी श़ॉ सोबतच उपकर्णधार शुभमन गिलने देखील चांगली कामगिरी केली आहे. वर्ल्ड कपमध्ये शुभमन गिल सर्वात यशस्वी बॅट्समन ठरला आहे.