लखनऊला सलग 2 विजय मिळूनही के एल राहुल नाराज का?

सलग 2 विजय मिळूनही के एल राहुल नाराज, टीममधील 'या' खेळाडूंवर संतापला

Updated: Apr 5, 2022, 08:10 AM IST
लखनऊला सलग 2 विजय मिळूनही के एल राहुल नाराज का? title=

मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या मोसमातील 12 वा सामना लखनऊ विरुद्ध हैदराबात झाला. या सामन्यात लखनऊ टीमला दुसऱ्यांदा विजय मिळाला. लखनऊ टीमला सलग दुसरा विजय मिळाला. या विजयाचा आनंद साजरा करायचा सोडाच पण कर्णधार के एल राहुल नाराज होता. 

सलग दोन सामने जिंकूनही के एल राहुलला आनंद झाला नाही. तर तो टीममधील काही खेळाडूंवर चांगलाच वैतागल्याचं पाहायला मिळालं. के एल राहुलच्या नाराजीचं नेमकं कारण समोर आलं आहे. 

राहुलकडून सामन्यानंतर मोठी अपडेट
पावर प्लेमध्ये विकेट्स घालवणं अजिबात आवडलं नाही. तसं जर वारंवार होत राहिलं तर त्याचा फॉर्मवर फरक पडतो. अजून बरं शिकण्याची गरज आहे. फलंदाजीवर अजून लक्ष द्यायला हवं आहे. गोलंदाजीमध्ये आम्ही तिन्ही सामन्यात वरचढ ठरलो. मात्र फलंदाजीमध्ये मार खाल्ला. 

पावर प्लेमध्ये आणखी चांगलं कसं करता येईल यावर अजून गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे अशी प्रतिक्रिया लखनऊचा कर्णधार के एल राहुलने दिली. पावर प्लेमध्ये लखनऊने 3 विकेट्स गमवल्या. क्विंटन आणि एविन लेविस 1 धाव काढून आऊट झाले. मनीष पांडेनं 11 धावा केल्या तर के एल राहुलने अर्धशतक झळकवलं. 

के एल राहुलकडून या खेळाडूचं खूप कौतुक
कर्णधारानं दीपक हुड्डाचं तोंडभरून कौतुक केलं. दीपकने 33 बॉलमध्ये 51 धावा केल्या. तो असा खेळाडू आहे जो मिडल ऑर्डवर उत्तम खेळू शकतो आणि त्याच्यावर डोळेझाकून विश्वास ठेवू शकतो. मी त्याच्या कामगिरीवर खूप खूश आहे असंही के एल राहुल म्हणाला आहे. 

लखनऊच्या आवेश खाननं 4 तर जेसनने 3 विकेट्स घेतल्या. हैदराबाद टीमला 12 धावांनी पराभूत केलं. हैदराबादचा कोणताच खेळाडू मोठी धावसंख्या करण्यात यशस्वी झाला नाही. याचं श्रेय के एल राहुलने गोलंदाजांना दिलं असून त्यांचं कौतुक केलं आहे.