देशातील राजकीय परिस्थितीवरुन हा दिग्गज क्रिकेटर संतापला, म्हणाला.....

आपल्या देशाची आणि जनतेची राजकारणामुळे झालेल्या अवस्थेमुळे दिग्गज क्रिकेटर हे अस्वस्थ झाले आहेत.  

Updated: Apr 4, 2022, 10:30 PM IST
देशातील राजकीय परिस्थितीवरुन हा दिग्गज क्रिकेटर संतापला, म्हणाला..... title=

मुंबई : श्रीलंकेतील स्थिती दिवसेंदिवस (Sri Lanka Crises) हलाखीची होत चालली आहे. नागरिकांना जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. आपल्या देशाची आणि जनतेची राजकारणामुळे झालेल्या अवस्थेमुळे श्रीलंकेचे दिग्गज क्रिकेटर हे अस्वस्थ झाले आहेत. सध्या आयपीएलच्या (IPL 2022) निमित्ताने श्रीलंकेचे 2 दिग्गज माजी क्रिकेटपटू भारतात आहेत. कुमारा संगकारा (Kumar Sangakara) राजस्थान रॉयल्समध्ये आहे. तर महिला जयवर्धने (Mahela Jaywardhene) मुंबई इंडियन्सच्या कोचिंग स्टाफमध्ये आहे. या दोघांनी श्रीलंकेतील परिस्थितीवरुन सरकारवर ताशेरे ओढले आहेत. (ipl 2022 rr rajsthan royals kumar sangakara and mumbai indians mahela jaywardene on sri lanka crises)

संगकारा काय म्हणाला?

"श्रीलंकेतील लोकं सर्वात कठीण प्रसंगाचा सामना करत आहेत. दैनंदिन जीवन जगण्यासाठीही त्यांना संघर्ष करावा लागतोय. लोक आणि कुटुंबांना संकटात पाहून मन हेलावून गेलंय. लोकं या सर्व प्रकाराविरोधात आवाज उठवत आहेत. तसेच यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी लोकांकडून केली जातेय", असं कुमार संगकाराने इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलंय. 

सरकारला आवाहन

"विध्वंसक राजकीय अजेंडा' बाजूला ठेवा. श्रीलंकेची गरज तिथली जनता आहे. लोकं शत्रू नाहीत. श्रीलंकेला तेथील लोकांची गरज आहे. वेळ संपत आहे, लोकांचं अंधारमय असलेलं भविष्य उद्धवस्त होण्यापासून वाचवायला हवं", असंही संगकाराने नमूद केलं.