लखऊनच्या पराभवानंतर कॅप्टन के एल राहुलला मोठा दणका

आधी मॅच गमवली आणि आता पैसेही गमवले.... कॅप्टन के एल राहुलला एवढ्या लाखांचा फटका

Updated: Apr 20, 2022, 03:17 PM IST
लखऊनच्या पराभवानंतर कॅप्टन के एल राहुलला मोठा दणका title=

मुंबई : बंगळुरूने लखनऊचा पराभव केला. 18 धावांनी लखनऊ टीमवर सामना गमवण्याची वेळ आली. आता आणखी एक मोठा फटका कॅप्टन के एल राहुलला बसला आहे. आधी सामना गेला आणि हातातून पैसेही गेले अशी परिस्थिती झाली. 

आयपीएलमध्ये कोड ऑफ कंडक्टचं उल्लंघन केल्या प्रकरणी कॅप्टन के एल राहुलला दंड भरावा लागणार आहे. ऑलराउंडर मार्कस स्टोइनिसला देखील दोषी ठरवण्यात आलं असून त्याच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे. 

अचार संहितेचं उल्लंघन केल्या प्रकरणी के एल राहुलला 20 टक्के फीमधील रक्क कापून घेण्याची शिक्षा मिळाली. अचार संहितेतील लेव्हल 1 चं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. 

स्टोइनिस आऊट झाल्यानंतर अंपायरवर संतापला होता. त्यामुळे त्याच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. स्टोइनिसने त्याची चूक मान्य केली आहे. तो 19 व्या ओव्हरमध्ये आऊट झाल्याने राग अनावर झाला आणि अंपायरशी वाद घालायला लागला. 

स्टोइनिसचं वर्तन नियमांचं उल्लंघन करणारं होतं त्यामुळे त्याच्यावरही आयपीएलच्या नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे. लखनऊ टीम 18 धावांनी सामना पराभूत झाली. बंगळुरू टीमला विजयाचा पाँईंट टेबलमध्ये मोठा फायदा झाला.