40 लाखात विकली गेली विराटची जर्सी, धोनी- रोहितच्या बॅटवरही लागली मोठी बोली, ऑक्शन दरम्यान पडला पैशांचा पाऊस

ऑक्शनमध्ये काही क्रिकेटर्सने त्यांच्या वस्तू लिलावासाठी दिल्या होत्या. ज्यापैकी विराट कोहलीच्या जर्सीवर 40 लाखांची बोली लावण्यात आली. 

Updated: Aug 24, 2024, 06:50 PM IST
40 लाखात विकली गेली विराटची जर्सी, धोनी- रोहितच्या बॅटवरही लागली मोठी बोली, ऑक्शन दरम्यान पडला पैशांचा पाऊस  title=
(Photo Credit : Social Media)

KL Rahul Auction Virat Kohli Jersey : भारताचा स्टार क्रिकेटर केएल राहुल आणि त्याची पत्नी अभिनेत्री अथिया शेट्टी यांनी 'क्रिकेट फॉर चॅरिटी' या नावाने ऑक्शनचे आयोजन केले होते. हे ऑक्शन विपला संस्थेसाठी करण्यात आले होते, जी गरजू मुलांच्या शिक्षणासाठी काम करते . या ऑक्शनमध्ये काही क्रिकेटर्सने त्यांच्या वस्तू लिलावासाठी दिल्या होत्या. ज्यापैकी विराट कोहलीच्या जर्सीवर 40 लाखांची बोली लावण्यात आली. 

'क्रिकेट फॉर चॅरिटी' या ऑक्शनमध्ये विराट कोहलीच्या जर्सीवर सर्वात मोठी म्हणजेच 40 लाखांची बोली लागली, तसेच त्याच्या ग्लव्सवर सुद्धा 28 लाखांची बोली लावण्यात आली. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याची बॅट सुद्धा 24 लाखांमध्ये विकण्यात आली. याशिवाय एम एस धोनी आणि राहुल द्रविड यांच्या बॅटवर अनुक्रमे 13 आणि 11 लाखांची बोली लावण्यात आली. यासोबतच केएल राहुलने स्वतःची जर्सी सुद्धा ऑक्शनमध्ये ठेवली होती. त्यावर 11 लाखांची बोली लावण्यात आली. 

हेही वाचा : Shikhar Dhawan Records: शिखर धवनच्या करिअरमधील 5 मोठे रेकॉर्डस्, जे विराट- रोहित सुद्धा मोडू शकत नाहीत

 

केएल राहुल आणि पत्नी अथिया या दोघांनी सुरु केलेल्या या मोहिमेत जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत आणि संजू सॅमसन हे क्रिकेटर सुद्धा सोबत जोडले गेले. एवढेच नाही तर जोस बटलर, क्विंटन डी कॉक आणि निकोलस पूरन हे आंतरराष्ट्रीय स्टार क्रिकेटर सुद्धा या मोहिमेचा भाग बनवले होते. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार 'क्रिकेट फॉर चॅरिटी' या माध्यमातून झालेल्या ऑक्शनमधून 1.93 कोटी रुपयांचा फंड गोळा करण्यात आला. स्वतः राहुलने याबाबत इंस्टाग्राम स्टोरी शेअर करुन माहिती शेअर केली. ऑक्शन यशस्वीपणे पूर्ण झाले आणि हे पैसे गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरण्यात येतील म्हणून त्याने आनंद व्यक्त केला. विपला फाऊंडेशनच्या सहकार्याने चालवलेल्या या मोहिमेसाठी लोक राहुल आणि अथियाचे कौतुक आणि कौतुक करत आहेत.