मुंबई : आयपीएल सामन्यादरम्यान असे अनेक प्रसंग घडतात, ज्याची चर्चा खूप रंगते. आता असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये मुंबईचा ऑलराऊंडर कायरन पोलार्ड (Kieron Pollard)याच्या बॉलिंगची अॅक्शन पाहून सारेच चक्रावले आहेत. त्याने एका ओव्हरमध्ये असा बॉल टाकला की त्याची ही अॅक्शन पाहून कर्णधार रोहित शर्मासह, (Rohit Sharma) अंपायर आणि संपूर्ण स्टेडियमला हसू आवरलं नाही.
मुंबई इंडियन्स (MI) विरूद्ध कोलकाता नाईट राइडर्समध्ये (KKR)सोमवारी सामना झाला. या सामन्यात मुंबईचा 52 धावांनी पराभव झाला. या सामन्यात दहावी ओव्हर टाकायला आलेल्या कायरन पोलार्ड सोबत एक वेगळीच घटना घडली. ओव्हरचा पाचवा बॉल टाकताना, तो बॉल थेट अंपायरच्या पोटात जाऊन लागला. ही घटना पाहून रोहित शर्मासह अंपायर खळखळून हसू लागले. स्वत: कायरन पोलार्ड सुद्धा बॉलिंग अॅक्शनवर हसू रोखू शकला नाही.
— Patidarfan (@patidarfan) May 9, 2022
पोलार्डने अंपायरची मागितली माफी
दहाव्या ओव्हरचा पाचवा बॉल टाकताना कायरन पोलार्डच्या हातून बॉल निसटला आणि हा बॉल जाऊन अंपायरच्या पोटावरून जाऊन आदळला. या घटनेमुळे स्टेडियममधील सर्वांनाच हसू आले. या घटनेनंतर बॉलिंग अॅक्शनवर पोलार्डने अंपायरची माफी मागत आपली ओव्हर पूर्ण केली. या सामन्यात 52 धावांनी कोलकाता नाईट राइडर्सने (KKR) हा सामना जिंकला.