ILT20 2023: टीम इंडिया एकिकडे न्यूझीलंड (India vs New Zealand) विरूद्द टी20 मालिका खेळण्यास सज्ज झाली असताना, दुसरीकडे युएईमध्ये इंटरनेशनल टी20 लीग सुरु आहे. या लीगमध्ये एकापेक्षा एक दर्जेदार सामने पार पडत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या एका सामन्यात एमआय़ इमिरेट्सचा (mi emirates) कर्णधार किरॉन पोलार्डने (kieron pollard) भन्नाट कॅच पकडली आहे. सीमारेषेवर उभा असताना त्याने ही भन्नाट कॅच पकडली आहे. त्याच्या या कॅचची क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे.
एमआय़ इमिरेट्सचा कर्णधार किरॉन पोलार्डच्या (kieron pollard) नेतृत्वाखाली संघ इंटरनेशनल टी20 लीगमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. किरॉन पोलार्ड देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच त्याने सीमारेषेवर घेतलेल्या एका कॅचची क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे. पोलार्डच्या या कॅचच कौतूक होत आहे.
किरॉन पोलार्डने अबुधाबीच्या झायेद क्रिकेट स्टेडियमवर मंगळवारी रात्री एमआय़ इमिरेट्स आणि डेझर्ट वायपर्समध्ये (mi emirates vs desert vipers) सामना रंगला होता. या सामन्यात पोलार्डने (kieron pollard) धडाकेबाज दुसरे अर्धशतक झळकावले होते. पोलार्डने या सामन्यात 39 बॉलमध्ये 67 धावा ठोकल्या होत्या. या अर्धशतकी खेळीसह त्याने सीमारेषेवर एक उत्कृष्ट कॅच देखील घेतला होता. या कॅचने संघाचे मनोबल चांगलेच वाढले होते.
डेझर्ट वायपर्सच्या डावाची 8वी ओव्हर टाकण्यासाठी समित पटेल आला होता. या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर कॉलिन मुन्रोने समित पटेलचा एक फुल टॉस बॉल लाँग ऑनच्या दिशेने मारला होता. मात्र तो बॉल सीमारेषा पार करू शकला नाही, आणि सीमारेषेवर उभ्या असलेल्या पोलार्डने उंच उडी मारत एका हाताने कॅच घेतली. ही कॅच अशक्यच होती, मात्र त्याने एका हाताने घेऊन अनपेक्षित खेळाचे प्रदर्शन करून दाखवले.यावेळी कॉलिन मुन्रो 22 चेंडूत 41 धावांवर खेळत होता.
#PollyPandey, what have you done! @KieronPollard55 with a one-handed catch and the celebration to match. #MIEvDV #CricketOnZee #DPWorldILT20 #BawaalMachneWalaHai #HarBallBawaal @MIEmirates @ILT20Official pic.twitter.com/2eKZPWjoYk
— Zee Cricket (@ilt20onzee) January 24, 2023
किरॉन पोलार्ड (kieron pollard) हा वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा महत्त्वाचा सदस्य असण्याव्यतिरिक्त, इंडियन प्रीमियर लीग संघ मुंबई इंडियन्सचाही महत्त्वाचा खेळाडू होता.पोलार्डला 2010 मध्ये मुंबई इंडियन्सने करारबद्ध केले होते आणि मुंबईस्थित फ्रँचायझीसह 13 उत्कृष्ट हंगाम घालवले होते. तो आता आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा भाग नाही, परंतु कॅरेबियन अष्टपैलू खेळाडू फ्रँचायझी क्रिकेट खेळत आहे.