मुंबई: रन आऊट करायची अजब पद्धत सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. चेंडूला हात न लावताच खेळाडूनं रनआऊट केल्यानं चर्चा होत आहे.
क्राइस्टचर्चमध्ये खेळल्या गेलेल्या बांगलादेशविरुद्धच्या दुसर्या वन डे सामन्यात न्यूझीलंडने 5 विकेट्सने विजय मिळविला.
या विजयासह न्यूझीलंडने आता या मालिकेत अजयने २-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात बांगलादेशच्या डावादरम्यान न्यूझीलंडचा अष्टपैलू जेम्स नीशमने तमीम इक्बालला रनआऊट केलं. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने नीशमच्या या रनआऊटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
Neesham through on goal! It's out. @JimmyNeesh with some fine footwork to break the @BCBtigers partnership. 133/3 now in thee 31st over as the players have a drink. Tamim Iqbal out for 78. Follow play LIVE with @sparknzsport #NZvBAN pic.twitter.com/0mmjguWNYd
— BLACKCAPS (@BLACKCAPS) March 23, 2021
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की जेम्स नीशम चेंडूला हात न लावता कशा पद्धतीनं रन आऊट करत आहे. या व्हिडीओ पाहून भल्याभल्याना आश्चर्याचा धक्का बसला.
फलंदाज त्यावेळी 78 व्या रनवर असताना नीशमनं हाताने नाही तर पायाने रन आऊट केलं आहे. रन आऊटचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.