Jos Buttler : जयस्वालच्या चुकीची शिक्षा बटलरला? BCCI ने ठोठावला दंड

Jos Buttler : जयस्वालने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक झळकावलं. मात्र कोलकाताविरूद्धच्या सामन्यात जयस्वालच्या एका चुकीमुळे बटलरला दंड भरावा लागणार आहे. पाहा काय आहे नेमकं प्रकरणं

Updated: May 12, 2023, 07:53 PM IST
Jos Buttler : जयस्वालच्या चुकीची शिक्षा बटलरला? BCCI ने ठोठावला दंड title=

Jos Buttler : आयपीएल 2023 ( IPL 2023 ) मध्ये गुरुवारी राजस्तान रॉयल्स ( Rajasthan Royals ) विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders ) यांच्यात सामना रंगला होता. हा सामना राजस्थान रॉयल्सने 9 विकेट्सने जिंकला. राजस्थानच्या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो त्यांचा ओपनिंग फलंदाज यशस्वी जयस्वाल. जयस्वालने या सामन्यात 47 बॉल्समध्ये 98 रन्सची खेळी केली. या सामन्यात राजस्थानने विजय मिळवला खरा, मात्र एका चुकीचा भुर्दंड जॉस बटलरला भरावा लागला आहे. 

कोलकाताविरूद्धच्या सामन्यात जयस्वालने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक झळकावलं. जयस्वालने 13 बॉल्समध्ये 50 रन्स करण्याच रेकॉर्ड स्वतःच्या नावे नोंदवला. मात्र इतकी मोठी खेळी केवळ तो राजस्थानचा ओपनिंग पार्टनर जोस बटलर (Jos Buttler) मुळे करू शकला. 

जयस्वालसाठी बटलरने गमावली स्वतःची विकेट

यंदाच्या सिझनमध्ये राजस्थान रॉयल्सने दोन्ही ओपनर उत्तम फॉर्ममध्ये असल्याचं दिसून येतंय. कोलकाताविरूद्ध फलंदाजीला उतरल्यानंतर बटरल फलंदाजी करत असताना हर्षित राणा गोलंदाजी करत होता. यावेळी बटलरने य ओव्हरच्या चौथा बॉल पॉईंटच्या दिशेने खेळला. यावेळी बॉल आंद्रे रसेलच्या हाती गेल्याचं त्याने पाहिलं. यावेळी त्याने सिंगल रन काढण्याचा विचार केला नव्हता. मात्र नॉन स्ट्रायकर एंडला असलेल्या यशस्वी जायस्वाल रनसाठी धावला.

जयस्वालला आऊट करण्यासाठी रसेलने बॉल नॉन स्ट्रायकर एंडला फेकला. बटरलने यसस्वालला रन न काढण्याबाबत कॉल दिा मात्र, तोवर उशीर झाला. यावेळी जयस्वाल रन आऊट होऊ नये म्हणून बटरल स्वतः रन काढायला धावला आणि आऊट झाला. अशा पद्धतीने बटनरने जयस्वालसाठी स्वतःची विकेट कुर्बान केली. कारण आपण रन काढला तरी पोहोचू शकणार नाही, हे बटलरला माहिती होतं.

चूक जयस्वालची होती?

मुख्य म्हणजे, बटलरने जयस्वालला रन न घेण्याबाबत कॉल दिला होता. मात्र तरीही जयस्वालने रन काढला. त्यामुळे फलंदाजाचा कॉल जयस्वालने ऐकला नाही आणि बटलरला स्वतःची विकेट गमवावी लागली. दुसरीकडे बटलरचं हे बलिदान जयस्वालने व्यर्थ जाऊ दिलं नाही. 

बटलरचा पडला भुर्दंड

दरम्यान विकेट गेल्यानंतर बटरलच्या एका कृत्याने त्याला फटका बसला. आऊट झाल्यानंतर पव्हेलियनमध्ये जात असताना बटलरने बाऊंड्री लाईनजवळ स्वतःची बॅट आपटली. दरम्यान याच कारणामुळे बटलरला बीसीसीआयने दंड ठोठावला आहे. यावेळी बटलरने आयपीएलच्या आचार संहितेचं उल्लंघन केलं. यावेळी बटलरला 10 टक्के सामना फी म्हणून दंड भरावा लागणार आहे.