Yashasvi Jaiswal : आयपीएलमध्ये सध्या युवा खेळाडू दमदार कामगिरी करताना दिसत आहेत. तिलक वर्मा, रिंकू सिंह, सुयश शर्मा, साईसुदर्शन, तुषार देशपांडे आणि यशस्वी जयस्वालसारखे खेळाडू यंदाचा आयपीएल (IPL 2023) गाजवताना दिसताय. पण यातही सर्वाधक चर्चा आहे ती राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royal) डावखूरा फलंदाज यशस्वी जयस्वालची (Yashasvi Jaiswal). या हंगामात यशस्व भलताच फॉर्मात आहे. यशस्वीला रोखणं प्रत्येक संघाच्या गोलंदाजांसमोर आव्हान ठरत आहे. मुंबईविरुद्ध (Mumbai Indians) यशस्वीने अवघ्या 62 चेंडूत शतक ठोकलं. तर कोलकाता (Kolkata Knight Riders) विरुद्धच्या सामन्यात त्याने आयपीएलमधली फास्टेस्ट हाफसेंच्युरी केली.
यशस्वीची तुफान फलंदाजी
कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यातही यशस्वीची दमदार फलंदाजी पाहिला मिळाली. आयपीएलमधली फास्टेस्ट हाफसेंच्युरी केल्यानंतर आता या सामन्यातही यशस्वी सेंच्यूरी ठोकणार असं वाटत असतानाच तो 98 धावांवर नाबाद राहिला. राजस्थानाने कोलकाताविरुद्धचा हा सामना तब्बल 9 विकेट आणि 7 ओव्हर राखून जिंकला. पण यशस्वी जयस्वालचं शतक अवघ्या दोन धावांनी हुकलं. सामना जिंकल्याचं आनंद साजरा करत असतानाच राजस्थानच्या क्रिकेट चाहत्यांना यशस्वीच्या शतक हुकल्याचीही रुखरुख लागली.
शतक रोखण्यासाठी कुटील डाव
कोलकाताविरुद्धच्या सामन्यात यशस्वी शतकाच्या उंबरठ्यावर असताना त्याचं शतक पूर्ण होऊ नये यासाठी रडीचा डाव खेळण्यात आला. कोलकाताच्या सुयश शर्नाने निगेटीव्ही बॉलिंगचं प्रदर्शन केलं. त्याच्या या खेळीवर क्रिकेटचाहत्यांसह दिग्गज क्रिकेटप्रेमींनीही नाराजी व्यक्त केली आहे. खरं तर सुयश शर्माच्या आयपीएलमधल्या कामगिरीने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. पण राजस्थानविरुद्धच्या त्या एका सामन्याने त्याच्यावर नाराजी व्यक्त केली जात आहे.
राजस्थान रॉयल्सला जिंकण्यासाठी आणि यशस्वीला शतकासाठी मोजक्या धावांचीच गरज असताना सुयशने जाणूनबुजून वाईड बॉल टाकण्याचा प्रयत्न केला. जेणेकरुन अतिरक्त धाव्या जाव्यात आणि यशस्वी शतकापासून दूर राहावा. सामन्याच्या 13 व्या षटकात फलंदाजीसाठी राजस्थानचा कर्णधार संज सॅमसन उभा होता. राजस्थानला जिंकण्यासाठी अवघ्या तीन धावांची गरज होती. तर यशस्वीला शतकासाठी अवघ्या 6 धावांची गरज होती. गोलंदाजीसाठी कोलकाताच्या कर्णधाराने चेंडू सुयशच्या हाती सोपवला.
यावेळी सुयशने जाणूनबुजून वाईड बॉल टाकण्याचा प्रयत्न केला. पण संजू सॅमसने टप्प्यात येत एक धाव घेतली. सुयशच्या या कृतीवर कॉमेंटेटर आकाश चोपडा चांगलाच भडकला. त्याने ट्विट करत सुयशच्या त्या कृत्यावर खडेबोल सुनावले. यशस्वीचं शतक होऊ नये यासाठी वाईड बॉल टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला, ही क्रिकेटसाठी चांगली गोष्ट नाही असं आकाश चोपडा याने म्हटलंय. याशिवाय अनेक क्रिकेट प्रेमींनी सुयशच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली आहे. सुयशने मुद्दामहून वाईड बॉल टाकण्याचा प्रयत्न केला, जेणेकरुन यशस्वी शतक पूर्ण होणार नाही. सुयश लूजर असल्याचं या युजरने म्हटलंय.