हार्दिक पांड्याचे एलीसोबत ब्रेकअप, आता ‘या’ अभिनेत्रीमध्ये गुफ्तगू?

हार्दिक पांड्या विविध कारणांनी नेहमीच चर्चेत असतो.  एलीसोबत ब्रेकअप झाले असून आता ‘या’ अभिनेत्रीमध्ये गुफ्तगू सुरु आहे.

Updated: Jun 7, 2018, 07:25 AM IST
हार्दिक पांड्याचे एलीसोबत ब्रेकअप, आता ‘या’ अभिनेत्रीमध्ये गुफ्तगू? title=

मुंबई : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या विविध कारणांनी नेहमीच चर्चेत असतो. बॉलिवूड अभिनेत्री एली अवरामसोबत हार्दिकचं नाव जोडलं गेले होते. या दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेले. हार्दिकचा भाऊ कुणाल पांड्याच्या लग्नातही एली आली होती. परंतु आता या दोघांमध्ये बिनासल्याचे समोर आले असून याला कारण ठरली आहे बॉलिवूडची हॉट अभिनेत्री ईशा गुप्ता. याबाबत ‘डीएनए’ने वृत्त दिले आहे.

हार्दिकसोबतच्या रिलेशनशिपबाबत अभिनेत्री एली अवराम सिरियस होती. परंतु हार्दिकने तिला जास्त महत्त्व दिलेले नाही असेच दिसत आहे. यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाला आणि ब्रेकअपचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आता हार्दिकचं नाव ईशासोबत जोडले गेले आहे. एका पार्टीमध्ये ईशा आणि हार्दिकची भेट झाली. त्यानंतर दोघांमध्येही जवळीकता निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. एवढेच नाही तर ते डेट करत असल्याचीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे.