Umran Malik Yorker Video Viral : राजकोट येथे शनिवारपासून सुरू झालेल्या सौराष्ट्र आणि शेष भारत यांच्यातील पाच दिवसीय इराणी करंडक सामन्याच्या पहिल्या दिवशी काश्मीर-एक्स्प्रेस उमरान मलिकची (Umran Malik) कामगिरी चर्चेचा विषय ठरला आहे. उमरानने केलेल्या जबरदस्त प्रदर्शनाची सर्वात जास्त चर्चा आहे. अशातच जसप्रीत बुमराहचा (Jasprit Bumrah) बॅकअप गोलंदाज म्हणून उमरान आणि मोहम्मद सिराजला (Mohammed Siraj) विश्वचषक (T-20 World Cup 2022) संघासोबत घेतलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर उमरानही आपली उपयुक्तता दाखवून देताना दिसत आहे.
सामन्यातील एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. जो त्याच्या फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) ट्विटर हँडलवरून पोस्ट केला आहे. ज्यामध्ये उमरानने टाकलेला यॉर्कर फलंदाजालाही समजला नाही. यॉर्कर चेंडू स्विंग झालेला दिसत आहे. फलंदाज जाग्यावर उभा राहिलेला दिसून आला.
सौराष्ट्र और शेष भारताच्या सामन्यामध्ये पहिला बदल म्हणून उमरान मलिकला आणण्यात आलं होतं आणि येताच त्याने छाप पाडली. एकामागून एक मलिकने सौराष्ट्रावर हल्ला चढवला. सौराष्ट्रचा डाव संपला तेव्हा उर्वरित दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज मलिक होता. उमरानने फक्त 5.5 षटकांमध्ये 25 धावांत तीन गडी बाद केले.
ही कामगिरी करत उमरानने मेसेज दिला आहे की, दिलीप वेंगसरकरसारखा मोठा खेळाडू दुखापतग्रस्त बुमराहच्या जागी उमरानला संधी देण्याची जोरदार मागणी करत असेल तर ती अगदी योग्य आहे.
Umran Malik Sheer Pace Outswinging Yorker
Bowling : /25 in 5.5 Overs #SRH | #OrangeArmy | #OrangeArmy | #IPL2023 #IndvsSA | @umran_malik_01 pic.twitter.com/jSgtkPcTp0
— Orange Army (@OrangeArmyIPL) October 1, 2022
भारतीय संघ 6 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. पहिला मुक्काम पर्थ असेल, जिथं आठवडाभराचं शिबिर होणार आहे त्यानंतर तेथून संघ ब्रिस्बेनला जाईल.