IPL2021: सरावादरम्यान माहीचे तुफान 'हेलिकॉप्टर शॉटस', व्हिडीओ व्हायरल

यंदाच्या IPLवर कोरोनाचं सावट असलं तरी नियोजित वेळेत सामने होणार असल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे. सर्व संघांनी कंबर कसली आहे. IPL सुरू होण्यासाठी अवघे 3 दिवस शिल्लक आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सरावाचा वेगही वाढला आहे. 

Updated: Apr 5, 2021, 04:23 PM IST
IPL2021: सरावादरम्यान माहीचे तुफान 'हेलिकॉप्टर शॉटस', व्हिडीओ व्हायरल title=

मुंबई: यंदाच्या IPLवर कोरोनाचं सावट असलं तरी नियोजित वेळेत सामने होणार असल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे. सर्व संघांनी कंबर कसली आहे. IPL सुरू होण्यासाठी अवघे 3 दिवस शिल्लक आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सरावाचा वेगही वाढला आहे. 

चेन्नई सुपरकिंग्स संघाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या संघाचा यंदा चॅम्पियनशिपमध्ये पुरेपूर उतरण्यासाठी कसून तयारी सुरू असल्याचं दिसत आहे. त्यांच्या सराव कॅम्प लागल्यानंतर अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील समोर आले होते. आता CSKचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा सरावा दरम्यान एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Chennai Super Kings (@chennaiipl)

या व्हिडीओमध्ये धोनी फुल फॉर्ममध्ये दिसत आहे. प्रत्यक्षात सामन्या इतकाच सफाईदारपणे तो सरावादरम्यान हेलिकॉप्टर शॉट्स खेळताना दिसत आहे. त्याच्या या तुफान फलंदाजीमुळे इतर संघांचं टेन्शन नक्कीच वाढणार आहे.

9 एप्रिलपासून IPL सुरू होणार आहे. 10 एप्रिल रोजी चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स रंगणार आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाची कमान ऋषभ पंतवर आहे. त्यामुळे यावेळी तो काय नवीन स्ट्रॅटेजी आखणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.