आयपीएलने टीव्ही आणि डिजिटल प्रसारण हक्क 44,075 कोटींना विकले!

आयपीएल मीडिया हक्कबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली आहे. 2023-2027 या पाच वर्षांसाठी आयपीएल प्रसारण हक्कासाठी लिलाव सुरु होता.

Updated: Jun 13, 2022, 05:39 PM IST
आयपीएलने टीव्ही आणि डिजिटल प्रसारण हक्क 44,075 कोटींना विकले!  title=

मुंबई: आयपीएल मीडिया हक्कबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली होती. 2023-2027 या पाच वर्षांसाठी आयपीएल प्रसारण हक्कासाठी लिलाव सुरु होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएलच्या 2023-2021 टीव्ही आणि डिजिटल प्रसारणाचे हक्क 44,075 कोटींना विकले आहेत.

सोमवारी आयपीएल लिलावाच्या दुसऱ्या दिवशी भारतीय उपखंडातील टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया हक्कांची विक्री झाली. टीव्हीचे हक्क 23575 कोटींना विकले गेले आहेत, तर डिजिटल अधिकार 20500 कोटींना विकले गेले आहेत. आयपीएलच्या पुढच्या सीझनमध्ये दोन ब्रॉडकास्टर्स बघायला मिळतील म्हणजेच सामना टीव्हीवर आणि इतरत्र डिजिटलमध्ये पाहायला मिळेल. 

पाच वर्षांच्या कालावधीसाठी प्रति हंगाम 74 सामने असणार आहेत. पाच वर्षात आयपीएलचे 410 सामने खेळले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. टीव्ही प्रसारणाचे हक्क 23,575 कोटी रुपये म्हणजेच प्रति सामना 57.5 कोटी रुपये आहे आणि भारतासाठी डिजिटल प्रसारणाचे हक्क  20,500 कोटी रुपये म्हणजे प्रति सामना 50 कोटी रुपये आहे. एएनआयच्या सूत्रांनुसार, दोन मीडिया हाऊसने बोली जिंकली आहे, एक टीव्हीसाठी आणि दुसरी डिजिटलसाठी. मीडिया हक्कांचे मूल्य अडीच पटीने वाढले आहे. 

या लिलावानंतर आयपीएल ही जगातील सर्वात मोठी लीग बनली आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL) ने मीडिया हक्कांच्या बाबतीत इंग्लिश प्रीमियर लीग (EPL) ला मागे टाकले आहे. आता फक्त एनपीएल (NPL) इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या पुढे आहे.