IPL संघाकडून ऑस्ट्रेलियन खेळाडूंना 41 कोटींची ऑफर; नेमकं काय आहे प्रकरण?

एका वर्षाच्या करारासाठी ऑस्ट्रेलियन खेळाडूंशी संपर्क

Updated: Oct 29, 2022, 06:05 PM IST
IPL संघाकडून ऑस्ट्रेलियन खेळाडूंना 41 कोटींची ऑफर; नेमकं काय आहे प्रकरण? title=
(फोटो सौजन्य - क्रिकेट ऑस्ट्रेलिया)

खेळाडूंनी फ्रँचायझी क्रिकेटमध्ये खेळल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला (international cricket) धोका असल्याची चर्चा अनेकदा होत असते. दक्षिण आफ्रिका (south africa league) आणि यूएईमध्ये (UAE) टी-20 (T20) लीग आल्यानंतर हा वाद आणखी वाढला आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियातील (Australia) द एज या माध्यमांने दिलेल्या वृत्तानुसार  इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) फ्रँचायझींनी एक वर्षाच्या करारासाठी ऑस्ट्रेलियन आंतरराष्ट्रीय खेळाडूंशी (international Player) संपर्क साधला आहे.

द एजने वृत्त दिलेल्या वृ्त्तानुसार  कसोटी कर्णधार पॅट कमिन्स (pat cummins), ग्लेन मॅक्सवेल (glenn maxwell) आणि डेव्हिड वॉर्नर (david warner) सारख्या काही महत्त्वाच्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना एक वर्षाच्या करारासाठी 5 दशलक्ष डॉलरची ( 41 कोटी) ऑफर देण्यात आली आहे. कमिन्स हा सध्या ऑस्ट्रेलियाचा सर्वाधिक मानधन घेणारा क्रिकेटपटू आहे. परंतु अहवालात दिलेला आकडा हा क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या (Australia) सध्याच्या वार्षिक कराराच्या दुप्पट आहे.

मात्र फ्रँचायझींनी खेळाडूंना एवढी मोठी रक्कम देण्याचे कारण आयपीएल नाही. जर तुम्ही असा विचार करत असाल की आयपीएल वर्षभर खेळवली जाणार आहे, तर तुम्ही चुकीचे आहात. आयपीएल (IPL) संघांनी जगभरातील लीगमध्ये प्रवेश केला आहे. दक्षिण आफ्रिकेतील नवीन SA20 लीगमधील सर्व सहा संघ आयपीएल फ्रँचायझींच्या मालकीचे आहेत. मुंबई इंडियन्सप्रमाणेच (mumbai indians) इतर फ्रँचायझींनीही यूएई लीगमधील (UAE league) संघांमध्ये भाग घेतला आहे.

खेळाडूंना बोर्डाची परवानगी आवश्यक 

कोलकाता नाईट रायडर्सकडे (KKR)कॅरिबियन प्रीमियर लीग (CPL) मधील त्रिनबागो नाइट रायडर्स तसेच यूएई इंटरनॅशनल लीगमधील अबू धाबी संघाची मालकी आहे. केकेआर लवकरच अमेरिकन फ्रेंचाइज लीगमधील लॉस एंजेलिस संघाची मालक होणार आहे. खेळाडूंना फ्रँचायझी संघांसोबत वार्षिक करार करण्यासाठी त्यांच्या संबंधित आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळांकडून ना हरकत प्रमाणपत्र (NOC) आवश्यक असेल.

द एजने वृत्तात म्हटले आहे की, याबाबत माहिती असलेल्या सूत्रांनी मात्र कोणत्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी यात स्वारस्य दाखवले आहे हे सांगितले नाही. पण जसजसे खेळाडू निवृत्तीच्या जवळ येतील तसतसे ते त्यात रस दाखवू शकतात. एका सूत्राने दावा केला की खेळाडू 18 महिने ते दोन वर्ष अशा करारासाठी तयार होतील.