IPL Qualifier 2019 : चेन्नई विरुद्ध मुंबई, बॉल एक किस्से अनेक

हा सर्व प्रकार मॅचच्या पहिल्या इनिंगमधील शेवटच्या ओव्हरमध्ये घडला. 

Updated: May 8, 2019, 05:23 PM IST
IPL Qualifier 2019 : चेन्नई विरुद्ध मुंबई, बॉल एक किस्से अनेक title=

चेन्नई : मुंबई विरुद्ध चेन्नई यांच्यात ७ मे रोजी क्वालिफायरचा पहिला सामना खेळण्यात आला. या सामन्यात मुंबईने चेन्नईचा ६ विकेटने पराभव करत फायनलमध्ये धडक मारली. या सामन्यादरम्यान एक विचित्र पण गंमतीदार दृश्यं पाहायला मिळाला. 

नक्की काय घडले? 

हा सर्व प्रकार मॅचच्या पहिल्या इनिंगमधील शेवटच्या ओव्हरमध्ये घडला. शेवटची ओव्हर जसप्रीत बुमराह ओव्हर टाकत होता. ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर धोनीने शॉट मारला. शॉट मारताना धोनीच्या हातून बॅट सरकली. धोनीने मारलेला बॉल इशान किशनच्या दिशेने गेला. ईशान किशनने उडी मारत जबरदस्त कॅच घेतली.

 

कॅच घेतल्याने मुंबईच्या टीममध्ये आणि समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. पण उत्सुकता अजून बाकी होती. कारण बुमराहने टाकलेला बॉल नो बॉल असल्याचे रिप्लेमधून समोर आले. 

साधारणपणे विकेट गेल्यानंतर खेळाडूला बाद घोषित करण्याआधी तो बॉल नो नसल्याची खबरदारी घेतली जाते. हा बॉल तपासण्याआधीच अंपायरने नो बॉल म्हणून जाहीर केले. त्यामुळे धोनीला जीवनदान मिळाले.. आणि त्याच्या चाहत्यांनी 
आनंदानं एकच जल्लोष केला. 

या एकाच बॉलवर क्रिकेट चाहत्यांना तीन वेगळे किस्से पाहायला मिळाले. पहिल्यांदा बॅटसमनच्या हातातून बॅट उडाली... टोलावलेला बॉल थेट कॅच केला गेला... पण हा तर नो बॉल निघाला... आहे की नाही मजेशीर किस्सा...

दरम्यान चेन्नईने मुंबईला विजयासाठी १३२ रनचे आव्हान दिले होते. मुंबईने हे विजयी आव्हान ४ विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. चेन्नईचा पराभव झाला असला तरी त्याना फायनलमध्ये येण्याची दुहेरी संधी आहे. ८ मे रोजी (आज) दिल्ली विरुद्ध हैदराबाद यांच्यात एलिमीनेटर सामना होणार आहे. यांच्यातून जिंकणारी टीम ही चेन्नई विरुद्ध खेळेल.