मुंबई: आयपीएलमध्ये आज दिल्ली विरुद्ध मुंबई आणि राजस्थान विरुद्ध चेन्नई सामना होत आहे. प्ले ऑफच्या स्पर्धेत चेन्नई पहिल्या स्थानावर तर उर्वरित संघ अजूनही पोहोचणं बाकी आहे. बंगळुरू, मुंबई, दिल्ली आणि कोलकाता या संघांमध्ये प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. पॉइंट टेबलमध्ये कोलकाता संघ चौथ्या स्थानावर आहे.
IPLमध्ये कोलकाता टीमचा कर्णधार इयोन मॉर्गनवर आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. आतापर्यंतच्या झालेल्य़ा सामन्यात त्याला चांगली कामगिरी करता न आल्याने कोलकाताचे चाहते नाराज आहेत. असाच प्रकार सुरू राहिला तर प्ले ऑफच्या रेसमधून कोलकाता बाहेर जाईल असा दावा दिग्गज क्रिकेटपटूने केला आहे.
कोलकाता संघाचा कर्णधार इयोन मॉर्गनने राजीनामा द्यावा असा सल्ला यावेळी क्रिकेटपटूने दिला आहे. इतकच नाही तर कर्णधारपदाची जबाबादारी कोणाच्या खांद्यावर आणि ती सोपवणं का योग्य याचं उत्तरही त्याने सांगितलं आहे. इयोन मॉर्नगच्या फलंदाजीवर आकाश चोपडा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी इयोनला संघाचं कर्णधारपद सोडण्याचा सल्ला दिला आहे.
आकाशचा असा विश्वास आहे की यावेळी कोलकाता संघ व्यवस्थापनाने मॉर्गनच्या जागी संघाचा कर्णधार म्हणून शाकिब अल हसनकडे ही जबाबदारी द्यायला हवी. आकाश म्हणाले की, मी मॉर्गनला आपली चांगली कामगिरी करण्यात यश मिळत नाही. अशाने कोलकाता संघ प्लेऑफमधून बाहेर पडण्याचा धोका आहे.
अकाश चोपडा यांनी ट्विट करत म्हटलं की कठीण काळात तुम्हाला कठोर पावले उचलावी लागतात. KKR च्या उर्वरित सामन्यांसाठी शाकिबला कर्णधार बनवण्याचा विचार करू शकतो का? शाकिबची आयपीएलमधील कामगिरी चांगली आहे. मॉर्गन विरुद्ध माझ्या मनात काही नाही. मात्र सध्या संघासाठी प्ले ऑफला जाणं महत्त्वाचं आहे.
कोलकाता संघ पॉइंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. 12 सामन्यांपैकी या संघाने 5 सामने जिंकले आहेत. पंजाब किंग्ससोबत झालेल्या सामन्यात थोडक्यासाठी विजय हातून निसटला. आता मुंबई, दिल्ली आणि बंगळुरू यांच्यासोबत कोलकाताची स्पर्धा आहे. प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी कोलकाता संघाला जास्त मेहेनत घ्यावी लागणार आहे.