आयपीएल फायनलमधला बॉल बॉयचा हा कॅच पाहून सगळेच हैराण

सोशल मीडियावर व्हायरल होतोय हा कॅच...

Updated: May 28, 2018, 08:37 PM IST
आयपीएल फायनलमधला बॉल बॉयचा हा कॅच पाहून सगळेच हैराण title=

मुंबई : आयपीएल 2018 च्या फायनलमध्ये चेन्नईने हैदराबादवर विजय मिळवला. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यावर अनेकांचं लक्ष होतं. जगभरात आयपीएलच्या फीव्हर असतो. प्रत्येक जण आपल्य़ा टीमला सपोर्ट करण्यासाठी मैदानावर येत असतात. ज्यांना शक्य नाही ते घरुनच सामन्याचा आनंद घेतात. या सामन्यादरम्यान बॉन्ड्रीवर बॉल देण्याचं काम करणाऱ्या एका बॉल बॉयचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचा कॅच पाहून अनेक जण हैराण झाले आहे.

सामन्यामध्ये हैदराबादने आधी बॅटींग करण्यासाठी उतरली होती. ब्रावोच्या आठव्या ओव्हरमध्ये जेव्हा सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सनने गुडघ्यावर बसून एक शानदार शॉट मारला. तेव्हा तो बॉल बॉन्ड्रीवर उपस्थित बॉल बॉयने पकडला. प्रत्येकाने त्याच्या या कॅचचं कौतूक केलं.