IPL Eliminator 2021 | बंगळुरुकडून कोलकाताला विजयासाठी 139 धावांचे आव्हान

बंगळुरुने (RCB) कोलकाताला (KKR) विजयासाठी 139 धावांचे आव्हान दिले आहे.   

Updated: Oct 11, 2021, 09:14 PM IST
IPL Eliminator 2021 | बंगळुरुकडून कोलकाताला विजयासाठी 139 धावांचे आव्हान title=

यूएई : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील एलिमिनेटर सामना (IPL 2021 Eliminator)  हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात खेळवण्यात येत आहे. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलेल्या बंगळुरुने कोलकाताला विजयासाठी 139 धावांचे आव्हान दिले आहे. (ipl eliminator 2021 rcb vs kkr royals chalengers banglore set 139 runs target for Kolkata Knight Riders at  Sharjah Cricket Stadium)

बंगळुरुने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 138 धावा केल्या. आरसीबीकडून कर्णधार विराट कोहलीने 33 चेंडूत 5 चौकारांसह 39 धावांची खेळी केली. तर सलामीवीर देवदत्त पडीक्कलने 21 धावा केल्या. कोलकाताकडून फिरकीपटू सुनील नरेनने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर लॉकी फर्ग्यूसनने 2 फलंदाजांना माघारी पाठवलं.

RCB Playing Eleven : विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, श्रीकर भारत (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, एबी डीव्हीलियर्स, शाहबाज अहमद, डैन क्रिश्चियन, जॉर्ज गार्टन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहल. 

कोलकाताचे शिलेदार : शुभमन गिल, वेंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, इयोन मोर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शाकिब अल हसन, सुनील नरेन, लॉकी फर्ग्यूसन, शिवम मावी आणि वरुण चक्रवर्ती.