कोलकाता : बराच काळ आऊट ऑफ फॉम असलेल्या क्रिकेटर उन्मुक्त चंदने आयपीएल लिलाव (२०१८) च्याआधी दमदार खेळी केली.
त्याने मुश्ताक अली टी २० ट्रॉफीच्या फायनलमध्ये धडाकेबाज ५३ रन्स करत दिल्लीला विजय मिळवून दिला.
या खेळाडूसाठी ही बॅटींग महत्त्वाची होती. कारण बराच मोठा काळ त्याची बॅट शांत होती. बिहार खासदार पप्पू यादव यांचा मुलगा सार्थक रंजनच्या सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
त्यावेळी मुश्ताक अली टूर्नामेंटमध्ये उन्मुक्तला संधी मिळाली. त्याने या संधीचा पुरेपुर फायदा घेत शानदार अर्धशतक केले.
रिषभ पंत (१३) आणि अनुभवी गौतम गंभीर (२७) हे स्वस्तात आऊट झाल्यानतर उन्मुक्तने चांगला खेळ केला.
त्यामूळे दिल्लीने ६ विकेटच्या बदल्यात १५३ रन्स केले. त्यानंतर राज्यस्थानची टीम १९.१ ओव्हरमध्ये ११२ रन्सच करु शकली.
या खेळीमूळे उन्मुक्तची बोली वाढण्याची शक्यता आहे.
इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या सीजनसाठी जगभरातील खेळाडूंवर आज बोली लागणार आहे.
सर्व जगातील क्रिकेट प्रेमींचं शनिवारी आणि रविवारी होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावावर असेल. या लिलावात एकूण 578 खेळाडू आहेत. ज्यांच्यावर बोली लागणार आहे. ज्यामध्ये 244 कॅप्ड खेळाडू आहेत. त्यापैकी 62 भारतीय आहेत. 332 अनकॅप्ड खेळाडूंमध्ये 34 विदेशी खेळाडू आहेत.