'अनेकदा जेव्हा त्याचा संघ हारतो, तेव्हा तो...', सेहवागने विराट कोहलीचा उल्लेख करत स्पष्टच म्हटलं, 'मोठ्या सामन्यात...'

IPL 2024: हंगामाच्या सुरुवातीला गुणतालिकेत तळाशी असणाऱ्या बंगळुरु (RCB) संघाने चेन्नईचा पराभव करत दिमाखात प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. या सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) पुन्हा एकदा आपण महान खेळाडू असल्याचं सिद्ध केलं आहे.   

शिवराज यादव | Updated: May 19, 2024, 07:28 PM IST
'अनेकदा जेव्हा त्याचा संघ हारतो, तेव्हा तो...', सेहवागने विराट कोहलीचा उल्लेख करत स्पष्टच म्हटलं, 'मोठ्या सामन्यात...' title=

IPL 2024: हंगामाच्या सुरुवातीला गुणतालिकेत तळाशी असणाऱ्या बंगळुरु (RCB) संघाने चेन्नईचा (CSK) पराभव करत दिमाखात प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. बंगळुरुने आपल्या अखेरच्या लीग सामन्यात 27 धावांनी चेन्नईचा पराभव केला. चेन्नई आणि बंगळुरु दोन्ही संघांसाठी हा करो या मरो सामना होता. एकीकडे विजयासह बंगळुरु प्लेऑफमध्ये पोहचला असताना, चेन्नई संघ बाहेर पडला आहे. सुरुवात अत्यंत वाईट झालेल्या बंगळुरु संघाने दमदार कमबॅक करत सलग 6 सामने जिंकण्याचा पराक्रम करत क्रिकेटचाहत्यांना आश्चर्यचकित केलं आहे. 

या सामन्यात पुन्हा एकदा विराटने दमदार कामगिरी केली. या संपूर्ण हंगामात विराटने आपण महान खेळाडू अस्लयाचं सिद्ध केलं आहे. बंगळुरु संघाच्या माजी कर्णधाराने 29 चेंडूत 47 धावा ठोकल्या. 162.07 च्या सरासरीने त्याने 3 चौकार आणि 4 षटकार ठोकले.  विराटच्या या खेळीने भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवाग प्रभावित झाला आहे. Cricbuzz शी बोलताना त्याने तोंडभरुन विराटचं कौतुक केलं आहे. विराट कोहली स्टार परफॉर्मर आहे असं सांगताना त्याने फाफ डू प्लेलिसपेक्षा त्याने चांगली कामगिरी केल्याची कौतुकाची थाप दिली.

IPL 2024: 'धोनीमुळे आपण जिंकलो, त्याने...,' दिनेश कार्तिकचे शब्द ऐकताच ड्रेसिंग रुममध्ये पिकला हशा

 

"सुरुवात फार महत्त्वाची होती आणि विराटने संघाला दमदार सुरुवात करुन दिली. फाफ डू प्लेसिसने त्याच्यापेक्षा जास्त धावा केल्या असल्या तरी कोहलीने जी लय मिळवून दिली ती ती महत्त्वाची होती. तो स्टार परफॉर्मर आहे. तो 47 धावांवर आऊट झाला. यावेळी त्याचा स्ट्राइक रेट 162.07 होता. त्याने जबरदस्त फलंदाजी केली. विराट कोहली ज्याच्यासाठी ओळखला जातो, तशीच कामगिरी केली. आपण मोठ्या सामन्यातील मोठे खेळाडू असल्याचं त्याने दाखवून दिलं आहे," असं तोंडभरुन कौतुक विरेंद्र सेहवागने केलं आहे.

'RCB ने असं सेलिब्रेशन करायला नको होतं,' हर्षा भोगले यांनी सुनावलं, 'किमान तुम्ही धोनीला...'

 

पुढे त्याने म्हटलं की, "विराट कोहलीला खेळताना पाहणं एक पर्वणी होती. त्याला खेळताना, धावा करताना आणि जिंकताना पाहणं आनंदाचं होतं. अनेकदा जेव्हा त्याच्या संघाचा पराभव होतो, तेव्हा चो चांगली कामगिरी करतो, पण संघ हारतो. पण आज जबरदस्त क्षण होता. त्याने धावा केल्या, संघ जिंकला आणि पात्रही झाला. आजचं सेलिब्रेशन डबल होतं".

बंगळुरुकडून फाफ डू प्लेसिसने (54) अर्धशतक झळकावलं. संघाने 20 षटकांत 5 बाद 218 धावा केल्या. रजत पाटीदार (41), कॅमेरॉन ग्रीन (38) यांनीही महत्त्वाचं योगदान दिलं. 219 धावांचा पाठलाग करताना, चेन्नईला प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी किमान 200 पर्यंत पोहोचणं आवश्यक होते. परंतु यश दयालने अखेरच्या ओव्हरमध्ये चेन्नईला 20 षटकात 7 बाद 191 धावांवर रोखलं. शेवटच्या षटकात दयालने पहिल्या चेंडूत षटकार बसल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर धोनीला बाद केलं. त्यानंतर उर्वरित चेंडूंमध्ये शार्दुल ठाकूर आणि रवींद्र जडेजाला संधीच दिली नाही आणि संघाला विजय मिळवून दिला.