IPL 2024 : लवकर विराटच्या नावे होणार नवा विक्रम; टी-20 मध्ये पहिला भारतीय बनणार

Virat Kohli : IPL 2024 चा पहिला सामना धोनीच्या सीएसके आणि डू प्लेसीसच्या आरसीबीमध्ये 22 मार्चला चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. पण या मॅचमध्ये बंगळूरूचा स्टार बॅट्समन विराट कोहली याच्याकडे आणखी एक विक्रम बनवण्याची संधी आहे. आयपीएलच्या पहिल्या सामन्यात विराट कोहली फक्त 6 धावा करून टी 20 क्रिकेटमध्ये आणखी विक्रमाची नोंद करणार आहे. 

Updated: Mar 13, 2024, 05:10 PM IST
IPL 2024 : लवकर विराटच्या नावे होणार नवा विक्रम; टी-20 मध्ये पहिला भारतीय बनणार title=

Virat Kohli T20 cricket runs : चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू यांच्यात 22 मार्चला होणाऱ्या पहिल्या मॅचपासून आयपीएल 2024 चे रणशिंग फूंकले जाणार आहेत.  चेन्नईने आयपीएलच्या इतिहासात एकूण 5 वेळेस ट्रॉफी जिंकण्याचा कारणामा केलेला आहे. तर याउलट बंगळूरू आयपीएलची ट्रॉफी जिंकण्यात अजून अपयशी ठरलेली आहे. पण आयपीएलच्या 2024 च्या पहिल्या मॅचमध्ये विराट कोहलीकडे नवा किर्तीमान रचण्याची संधी आहे. 6 रन्स बनवताच तो टी 20 मध्ये एक विशेष विक्रम करणारा पहिला भारतीय बनणार आहे.  

6 धावा बनवताच रचणार हा किर्तीमान

 

विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. त्याच्या नावावर अनेक विक्रम आणि रेकॉर्ड असून, आता तो टी-20 क्रिकेटमध्ये एका नवीन विक्रमाच्या उंबरठ्यावर आहे. जर त्याने आयपीएल 2024 च्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 6 धावा केल्या तर कोहली टी-20 क्रिकेटमध्ये 12000 धावा पूर्ण करणारा पहिला भारतीय फलंदाज बनणार आहे. त्याच्याआधी कोणत्याही भारतीयाने टी-20 क्रिकेटमध्ये हा विक्रम केलेला नाही. जर कोहलीने आयपीएल 2024 च्या पहिल्या सामन्यात ६ धावा केल्या तर तो टी-20 क्रिकेटमध्ये इतिहास रचेल. विराट कोहली टी-20 क्रिकेटमध्ये 12000 धावांचा डोंगर गाठणारा जगातील चौथा फलंदाज बनणार आहे. त्याच्याआधी ख्रिस गेल, शोएब मलिक आणि किरन पोलार्ड या फलंदाजांनी हे यश मिळवले आहे.

 

टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात जास्त रन्स बनवणारे बॅट्समन

 

ख्रिस गेल- 14562 रन्स

शोएब मलिक- 13338 रन्स

किरन पोलार्ड- 12899 रन्स

एलेक्स हेल्स- 12295 रन्स

डेविड वॉर्नर- 12065 रन्स

विराट कोहली- 11994 रन्स
 

IPL मध्ये सूद्धा कोहलीचे विराट प्रदर्शन

 

विराट कोहली हे भारतीय क्रिकेटमधील एक जगप्रसिद्ध नाव आहे. विराटने अनेक विक्रम आणि रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. त्यापैकी एक विक्रम म्हणजे आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा, कोहलीने आतापर्यंत आयपीएलमध्ये 7263 धावा केल्या आहेत. त्याच्या करिअरमध्ये कोहलीने 7 शतके आणि 50 अर्धशतके ठोकली आहेत. तर विराट आयपीएलच्या पहिल्या सामन्यात 12000 धावांचा टप्पा पार करणार की नाही, यावर साऱ्यांची नजर असणार आहे.