IPL मध्ये रोहित शर्मा धोनीच्या CSK मधून खेळणार? 'या' खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ

IPL 2024 : भारत आणि इंग्लंजदरम्यानची पाच कसोटी सामन्यांची मालिका संपलीय आणि आता भरतीय क्रिकेटप्रेमींना उत्सुकता लागली आहे ती आयपीएलची. आयपीएलच्या सतराव्या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवलं होतं. आता रोहित शर्माबाबत नवी अपडेट समोर आली आहे. 

राजीव कासले | Updated: Mar 11, 2024, 03:12 PM IST
IPL मध्ये रोहित शर्मा धोनीच्या CSK मधून खेळणार? 'या' खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ  title=

IPL 2024 : भारत आणि इंग्लंजदरम्यानची पाच कसोटी सामन्यांची मालिका संपलीय आणि आता भरतीय क्रिकेटप्रेमींना उत्सुकता लागली आहे ती आयपीएलची (IPL 2024).  आयीएलच्या सतराव हंगाम येत्या 22 मार्चपासून सुरुवात होतोय. यंदाच्या आयपीएलपूर्वी अनेक घडामोडी घडल्या आहेत. आयपीएल मिनी ऑक्शनमध्ये अनेक खेळाडू एका संघातून दुसऱ्या संघात दाखल झाले आहेत. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) तर नवीन हंगामापूर्वी कर्णधारच बदलला आहे. मुंबई इंडियन्सने कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) नियुक्ती केली आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएल हंगामात रोहित शर्मा (Rohit Sharma) केवळ एक खेळा़डू म्हणून मैदानात उतरेल. 

रोहित शर्मा सीएसकेमध्ये?
गुजरात टायटन्समधून (GT) मुंबई इंडियन्समध्ये आलेल्या हार्दिक पांड्याला संघाची कमान दिल्याने चाहते मोठ्या प्रमाणावर नाराज आहेत. यातच आता एका खेळाडूच्या वक्तव्याने आयपीएल विश्वात खळबळ उडाली आहे. मुंबई इंडियन्स आणि नंतर चेन्नई सुपरकिंग्सचा माजी खेळाडू अंबाती रायुडूने (Ambati Rayudu) रोहित शर्माबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. 

रायडुच्या वक्तव्याने खळबळ
मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माला आयपीएलच्या पुढच्या हंगामात म्हणजे IPL 2025 मध्ये चेन्नई सुपरकिंग्समधून खेळताना बघायला आवडेल असं अंबाती रायडूने म्हटलं आहे. महेंद्र सिंग धोनीनंतर चेन्नईचा कर्णधार म्हणून रोहित शर्मा सर्वोत्तम उमेदवार असल्याचं रायडूने म्हटलंय. हिटमॅन पुढची आणखी 5 ते 6 वर्ष आयपीएल खेळू शकतो. अंबाती रायडूचं हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. काही क्रिकेट चाहत्यांनी रायडूला पाठिंबा दिला आहे आहे, तर काही जणांनी त्याच्यावर टीका केली आहे. रोहित शर्मा मुंबई इंडियन्सआधी डेक्कन चार्जर्स संघातून खेळलाय.

अंबाती रायडूने एका मुलाखतीत हे वक्तव्य केलं आहे. भविष्यात रोहित शर्माला सीएसके संघातून खेळतान पाहायाल आपल्याला आवडेल, मुंबई इंडियन्ससाठी तो अनेक काळ खेळतोय. आता त्याने चेन्नई सुपरकिंग्समधून खेळावं आणि तिथेही जिंकावं असं रायडूने म्हटलंय. आता हा निर्णय रोहित शर्माने घ्यायचा आहे, असंही रायडूने सांगितलं. 

धोनीचा चेन्नईत जोरदार सराव
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने गतवर्षी आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलंय. चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत तब्बल पाचवेळा जेतेपद पटकावलं आहे. धोनीचा हा आयपीएलचा अखेरचा हंगाम असल्याचं बोललं जातंय. गुढघ्याच्या दुखापतीमुळे धोनी गेल्या अनेक काळापासून त्रस्त आहे. यानंतरही नव्या हंगामात चेन्नईला सहाव्यांदा जेतेपद मिळवून देण्यासाठी धोनी सध्या जोरदार सराव करतोय. धोनी सध्या चेन्नईत असून त्याने संघातील इतर खेळाडूंबरोबर सराव सुरु केला आहे.