IPL 2024 : ट्रोलिंग नाही तर हार्दिकवर 'या' गोष्टीचं प्रेशर, रोहितची चूक दाखवत सेहवागने केली पांड्याची पाठराखण

Virender Sehwag Backs Hardik Pandya : मुंबई इंडियन्सच्या खराब परफॉर्मन्सनंतर पलटणसाठी प्लेऑफचं गणित अवघड झालंय. अशातच आता विरेंद्र सेहवागने पांड्याची बाजू मांडली आहे.

सौरभ तळेकर | Updated: Apr 23, 2024, 09:29 PM IST
IPL 2024 : ट्रोलिंग नाही तर हार्दिकवर 'या' गोष्टीचं प्रेशर, रोहितची चूक दाखवत सेहवागने केली पांड्याची पाठराखण title=
Virender Sehwag, Hardik Pandya

IPL 2024, Mumbai Indians : जयपूरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सने पराभवाची (MI vs RR) परंपरा कायम ठेवली. 12 वर्षांचा रेकॉर्ड मुंबई इंडियन्सला मोडता आला नाही. मुंबईच्या पराभवाला हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) खराब फलंदाजी आणि कॅप्टन्सीला जबाबदार धरण्यात येत आहे. हार्दिकला फलंदाजी करताना फक्त 10 धावा करता आल्या होत्या. त्यामुळे आता पांड्या कॅप्टन्सीमुळे नाही तर कामगिरीमुळे ट्रोल होतोय. पांड्याला अनेक खेळाडूंनी बॅक केल्यानंतर आता विरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) हार्दिकची पाठराखण केलीये. तर त्यावेळी सेहवागने रोहित शर्मीची चूक देखील दाखवून दिली.

काय म्हणाला विरेंद्र सेहवाग?

मला वाटत नाही की हार्दिकवर इतर कोणत्याही गोष्टींचं प्रेशर असेल. त्याच्यावर स्वत:च्या अपेक्षांचं दडपण असू शकतं. त्याच्या बॅटमधून पुरेशा धावा निघत नाहीयेत. पण गेल्या वर्षी देखील मुंबई इंडियन्सची अशीच स्थिती होती. रोहित कॅप्टन असताना देखील कॅप्टन म्हणून त्याच्या बॅटमधून धावा निघत नव्हत्या. रोहितच्या बॅटमधून धावा निघत नसताना मुंबईला गेल्या 2 वर्षात आयपीएल जिंकता आली नाही. त्यामुळे जर कॅप्टनचा परफॉर्मन्स होत नसेल आणि संघ हरत असेल, तर ते चुकीचे आहे, असं विरेंद्र सेहवागने (Virender Sehwag Backs Hardik Pandya) म्हटलं आहे.

मुंबई इंडियन्सला आणखी 6 सामने खेळायचे आहेत. त्यामुळे आता मुंबईला जर प्लेऑफ गाठायचं असेल तर उर्वरित 6 सामन्यांपैकी 5 सामने तरी जिंकावे लागणार आहेत. या 6 सामन्यांपैकी मुंबईला लखनऊविरुद्ध 2 आणि केकेआरविरुद्ध 2 सामने खेळायचे आहेत. तर तगड्या हैदराबादसोबत 1 सामना तर दिल्लीविरुद्ध देखील 1 सामना खेळायचा आहे. उर्वरित 6 सामन्यांपैकी 3 सामने मुंबई इंडियन्स घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडेवर खेळणार आहे. त्यामुळे आता मुंबईसाठी हा एक प्लस पाईट्स असणार आहे. मुंबईला हैदराबादचा सामना टफ जाण्याची शक्यता आहे. तर केकेआरविरुद्ध देखील मुंबईला मजबूत तयारी करावी लागणार आहे.

मुंबई इंडियन्सचा संघ - इशान किशन, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (c), टीम डेव्हिड, नेहल वढेरा, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा, आकाश मधवाल, नमन धीर, शम्स मुलानी, देवाल्ड ब्रेविस, रोमॅरियो शेफर्ड, श्रेयस गोपाल, कुमार कार्तिकेय, ल्यूक वुड, हार्विक देसाई, अर्जुन तेंडुलकर, शिवालिक शर्मा, अंशुल कंबोज, क्वेना माफाका.