'कमेंट्री बॉक्समधून बसून खेळाबद्दल बोलणे सोपे, पण..', विराट कोहलीने स्ट्राईक रेटवरुन कोणाला सुनावलं?

Virat Kohali : IPL 2024 च्या हंगामात गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सामन्यात विराटने दमदार खेळी खेळली. त्यानंतरही विराट कोहली कोणावर वैतागला?

नेहा चौधरी | Updated: Apr 29, 2024, 04:56 PM IST
'कमेंट्री बॉक्समधून बसून खेळाबद्दल बोलणे सोपे, पण..', विराट कोहलीने स्ट्राईक रेटवरुन कोणाला सुनावलं?  title=
IPL 2024 Its easy to sit from the box and talk about the game but Virat Kohli told whom on strike rate

Virat Kohli’s reaction on strike rate : IPL 2024 च्या हंगामात रविवारी 43वा सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सवर विजय मिळवला. गुजरात जायंट्सवर 9 विकेट्सने पराभव करत आतापर्यंतच्या मॅचमध्ये बंगळुरूचा हा तिसरा विजय ठरला. रविवारच्या मॅचमध्येही कॅप्टन विराट कोहलीची बॅट बॅट बॅट आग ओकत आहे. या सिझनमध्ये विराट कोहलीने आतापर्यंत एक शतक आणि 4 अर्धशतके झळकावली आहेत. तरीदेखील आक्रमक खेळीनंतरही विराट कोहलीने वैतागलेला दिसला. एवढंच नाही तर त्याने मॅच संपल्यानंतर अतिशय प्रखर शब्दात सुनावलंसुद्धा. (IPL 2024 Its easy to sit from the box and talk about the game but Virat Kohli told whom on strike rate)

कोणावर वैतागला विराट कोहली? 

गेल्या काही दिवसांपासून खराब स्ट्राइक रेटवरुन कोहलीला प्रचंड ट्रोल करण्यात आलंय. त्यात काही दिग्गजांनीही म्हणाले की, कोहली हा फिरकीपटूंविरोधात खास करुन टी20 फॉरमॅटमध्ये चांगला खेळ दाखवू शकतं नाही. 

काय म्हणाला विराट कोहली?

मॅचमध्ये दमदार खेळी आणि विजयानंतर विराट कोहली आनंदी तर होताच सोबत तो वैतागलेला दिसला. त्याने यावेळी बोलताना टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं. तो म्हणाला की, 'जे लोक म्हणतात आहे की, मी फिरकीविरुद्ध चांगला खेळत नाही शिवाय माझ्या स्ट्राइक रेटबद्दल कंमेट करतात. ही तिच लोक आहे ज्यांना याबद्दल बोलायला आवडतं. पण माझ्यासमोर कायम टीमला विजय मिळवून देणं हेच एक ध्येय असतं. त्यामुळे गेल्या 15 वर्षांपासून मी हे करतोय. तुमच्या टीमला विजय मिळवून देण्यासाठी तुम्ही दररोज मेहनत करत असता.'

पुढे विराट कोहली म्हणाला की, 'मला वाटत नाही की जी लोक दुसऱ्यावर टीका करता ते स्वत: अशा परिस्थितीचा त्यांनी कधी सामना केला असतो. मला माहिती आहे बॉक्समध्ये बसून खेळाबद्दल बोलणं सोपं आहे, पण मला याने खरंच फरक पडत नाही. मी फक्त माझे काम करतो. आम्ही आमच्या स्वाभिमानासाठी खेळत आहोत. लोक हे खेळाबद्दलचे त्यांचे विचार आणि समज मांडू शकतात. पण जे लोक मैदानात खेळतात त्यांना खरी परिस्थिती माहिती आहे. त्यामुळे माझ्यासाठी या गोष्टी सामान्य झाल्या आहेत.'