MI vs PBKS : मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल 2024 च्या 33 व्या सामन्यात आपला तिसरा विजय मिळवण्यात यशस्वी झाला आहे. पंजाबविरूद्धच्या सामन्यात मुंबईच्या अनेक फलंदाजांने उत्कृष्ट प्रद्रर्शन दर्शविले, ज्यामध्ये सुर्यकुमार यादवने 78 धावांची दमदार खेळी खेळली, तर तिलक वर्माने पण फक्त 18 बॉलमध्ये नाबाद 34 धावांची ताबडतोब इनिंग खेळली, ज्यामध्ये 2 चौके आणि 2 षटकार सामील होते. तिलक वर्माच्या या इनिंगमुळे त्याने आयपीएलमधील एका खास रेकॉर्डची बरोबरी केली आहे.
तिलक वर्माने पंजाब किंग्सविरूद्ध केवळ 18 बॉलमध्ये 34 धावांची ताबडतोब इनिंग खेळलीये, या इनिंगच्या मदतीमुळे मुंबई इंडियन्सही 192 धावांच्या लक्षापर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाली होती. पण या उत्कृष्ट खेळीमुळे तिलक वर्माने, 21 वर्षाच्या वयात 50 षटकार लावुन, ऋषभ पंतच्या विक्रमाची बरोबरी सुद्धा केली आहे. याआधी पंतने 21 वर्षाच्या वयात एकूण 94 षटकार ठोकले होते. अशातच आता या विक्रमाच्या लिस्टमध्ये तिलक वर्माने आपलं नाव दुसऱ्या क्रमांकावर नोंदवलं आहे. तर या लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर राजस्थानचा धाकड फलंदाज यशस्वी जयस्वाल याचा नंबर येतो, जयस्वालने 21 वर्षाच्या वयात एकूण 48 षटकार लगावले आहेत, यानंतर पृथ्वी शॉ हा 45 षटकारांसोबत चौथ्या क्रमांकावर आहे, तर पाचव्या क्रमांकावर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याच्या नावावर 38 षटकार आहेत.
आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचा आतापर्यंतचा प्रवास भले ही चढ-उताराचा राहिला आहे, पण मुंबईचा युवा फलंदाज तिलक वर्मासाठी आतापर्यंतचा आयपीएलचा सिजन खूप अप्रतिम गेलाय. तिलकने 7 इनिंगमध्ये तब्बल 41.60 च्या सरासरीने एकूण 208 धावा बनवल्या आहेत. तर आतापर्यंतच्या आयपीएलच्या प्रवासात तिलक वर्माने 32 सामन्यात तब्बल 948 धावा बनवल्या आहेत, ज्यामध्ये 4 अर्धशतक सामील आहेत. तर आता बघण्यायोग्य गोष्ट असणार की, आयपीएल 2024 च्या राहिलेल्या 7 सामन्यात तिलक वर्मा आपल्या टीमसाठी काय कमाल करून दाखवतो?
आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचा स्क्वॉड -
आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, डेवाल्ड ब्रेविस, इशान किशन, जेसन बेहरेनडॉर्फ, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, एन. तिलक वर्मा, नेहल वढेरा, पियुष चावला, रोहित शर्मा, रोमॅरियो शेफर्ड (ट्रेड), शॅम्स मुलानी, सूर्य कुमार यादव, टिम डेव्हिड, विष्णू विनोद, हार्दिक पंड्या (ट्रेड), गेराल्ड कोएत्जी, नुवान तुषारा, दिलशान मधुशंका, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, नमन धीर, अंशुल कंबोज, शिवालीक शर्मा