Video MI Celebration After GT Beat RCB: शुभमने विजयी Six मारल्यानंतर Mumbai Indians च्या खेळाडूंनी काय केलं पाहिलं का?

MI Players Celebration After GT Eliminate RCB: गुजरातच्या संघाने आरसीबीला साखळी फेरीतील अंतिम सामन्यात 6 विकेट्सने पराभूत केल्याने मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑप्ससाठी पात्र झालेला चौथा संघ ठरला.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 22, 2023, 11:16 AM IST
Video MI Celebration After GT Beat RCB: शुभमने विजयी Six मारल्यानंतर Mumbai Indians च्या खेळाडूंनी काय केलं पाहिलं का? title=
MI Celebration After GT Beat RCB

MI Celebration After GT Eliminate RCB: इंडियन प्रमिअर लिगच्या 16 व्या पर्वातील (IPL 2023) साखळी फेरीमधील अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या (RCB) संघाला 'करो या मरो'च्या सामन्यात विजय मिळवता आला नाही. गुजरात टायटन्सच्या (GT) संघाने बंगळुरुच्या संघाला 6 धावांनी पराभूत केलं. गुजरातच्या या विजयाचा फायदा मुंबई इंडियन्सला झाला. प्लेऑफ्ससाठी (IPL 2023 Playoffs) पात्र ठरण्यासाठी सर्व सुत्रं स्वत:च्याच हाती असलेल्या आरसीबीने मोक्याच्या क्षणी कच खाल्ली आणि संघ पुन्हा एकदा स्पर्धेबाहेर फेकला गेला. 

गुजरातच्या विजयाचं सेलिब्रेशन

गुजरातविरुद्धच्या पराभवामुळे आरसीबीला 14 गुणांवर समाधान मानावलं लागलं. तर या सामन्यापूर्वी हैदाराबादविरुद्धचा सामना मोठ्या फरकाने जिंकलेल्या मुंबईचे एकूण पॉइण्ट 16 झाल्याने ते या पॉइण्ट्सच्या जोरावर प्लेऑफ्ससाठी पात्र ठरले. आरसीबीने केवळ निसटता विजय मिळवला असता तरी ते प्लऑफ्ससाठी पात्र ठरले असते. मात्र तसं झालं नाही आणि मुंबईने पुन्हा एकदा प्लेऑप्समध्ये मजल मारली. गुजरातच्या या विजयानंतर मुंबईच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला. 

शुभमन-विजय शंकरची पार्टनरशीप

विराट कोहलीने दमदार शतक झळकावत बंगळुरुच्या संघाला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत केली. मात्र धावांचा पाठलाग करताना गुजरातच्या शुभमन गिलनेही दमदार शतक झळकावत संघाला विजय मिळवून दिला. सामन्यातील शेवटच्या ओव्हरमधील पहिल्याच चेंडूवर षटकार झळकावत शुभमनने विजयी धावा काढण्याबरोबरच आपलं शतकही साजरं केलं. 197 धावांचा पाठलाग करताना शुभमन आणि विजय शंकरने 123 धावांची पार्टनरशीप करत बंगळुरुच्या गोलंदाजीची पिसं काढली.

शुभमनने तो सिक्स मारला अन्...

शुभमने बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात लगावलेला शेवटचा फटका षटकार असल्याचं निश्चित झाल्यानंतर हा गुजरात विरुद्ध बंगळुरुचा सामना आपल्या चाहत्यांप्रमाणेच डोळ्यात तेल घालून पाहणाऱ्या मुंबईच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला. आनंदाने मुंबईचे सर्व खेळाडू उडा मारु लागले. नंतर या खेळाडूंनी एकमेकांना मिठ्या मारल्या. काही खेळाडूंनी आनंदाच्याभरात आपल्या सहकाऱ्यांना चक्क उचलून घेतलं. या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

असे असतील प्लेऑफ्सचे सामने

आता एलिमिनेटरमध्ये मुंबईचा संघ लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध खेळणार आहे. चेन्नईमधील चेपॉकच्या मैदानात हा सामना खेळवला जाणार आहे. त्यापूर्वी क्वालिफायर-1 मध्ये गुजरात आणि चेन्नई सुपर किंग्जसचे संघ एकमेकांविरोधात मैदानात उतरतील. या सामन्यात विजयी ठरणार संघ थेट अंतिम फेरीत दाखल होईल. क्वालिफायर-1 मध्ये पराभूत झालेल्या संघाला दुसरी संधीही मिळणार आहे. क्वालिफायर-1 मधील पराभूत संघ एलिमिनेटरमधील विजेत्या संघाविरुद्ध खेळेल. या सामन्यात विजयी होणार संघ अंतिम सामन्यात पोहचणार आहे. आयपीएलचा अंतिम सामना 28 मे रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.