VIDEO: हार्दिक पांड्याच्या मैदानातील वर्तवणुकीने सर्वांनाच धक्का! व्हिडीओ व्हायरल होताच एकच खळबळ

IPL 2023 GT vs PBKS: गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) कर्णधार हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. पंजाबविरोधात झालेल्या सामन्यातील हा व्हिडीओ पाहून क्रिकेट चाहते आश्चर्य व्यक्त करत आहेत. या व्हिडीओवर नेटकरी तुफान कमेंट्स करत आहेत.   

शिवराज यादव | Updated: Apr 14, 2023, 12:04 PM IST
VIDEO: हार्दिक पांड्याच्या मैदानातील वर्तवणुकीने सर्वांनाच धक्का! व्हिडीओ व्हायरल होताच एकच खळबळ title=

Hardik Pandya Viral Video: गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) कर्णधार हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल (Viral Video) झाला आहे. पंजाबविरोधात (Punjab Kings) गुरुवारी झालेल्या सामन्यातील हा व्हिडीओ पाहून खळबळ उडाली आहे. याचं कारण या सामन्यात हार्दिक पांड्या आपल्याच संघातील खेळाडूवर प्रचंड वैतागल्याचं दिसत आहे. हार्दिक पांड्याने आपल्या सहकाऱ्याशी अशाप्रकारे वर्तन केल्याने अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. हा व्हिडीओ पाहून नेटकरीही कमेंट करत असून हार्दिक पांड्यावर टीका करत आहेत.

नेमकं काय झालं होतं?

गुरुवारी झालेल्या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी केली. यावेळी 20 व्या ओव्हरमध्ये कर्णधार हार्दिक पांड्याने जलद गोलंदाज जोशुआ लिटलकडे चेंडू सोपवला. ही ओव्हर पूर्ण होण्याआधी गुजरात टायटन्स संघ वेळेत ओव्हर्स पूर्ण करु शकला नव्हता. ओव्हरचा दुसरा चेंडू टाकला जात असताना डीप कव्हरला क्षेत्ररक्षण करणारा मोहित शर्मा आपल्या जागेपासून थोडा लांब उभा होता.

मोहित शर्मा आपल्या निर्धारित ठिकाणी उभा नसल्याचं पाहून कर्णधार हार्दिक पांड्याचा पारा चढला. यानंतर त्याने मोहित शर्माला इशारा करत खडे बोल सुनावले असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. हार्दिक पांड्या यावेळी प्रचंड संतापला होता. व्हिडीओमध्ये हार्दिक पांड्याचा हा रुद्रावतार पाहून एकच चर्चा रंगली आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. 

गतवर्षीचे चॅम्पियन गुजरात टायटन्सने चांगल्या गोलंदाजीनंतर फलंदाजीतही जबरदस्त कामगिरी केली. शुभमन गिलने केलेल्या 67 धावांच्या जोरावर गुजरातने सहा गडी राखत पंजाबचा पराभव केला. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 8 गडी गमावत 153 धावा केल्या होत्या. गुजरातसमोर 154 धावांचं आव्हान असताना शुभमन गिलने 49 चेंडूत सात चौकार आणि एक षटकार ठोकत 67 धावा केल्या. पण हा सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगला आणि एक चेंडू राखत विजय मिळवला. 

विजयानंतरही पांड्या नाराज

सामन्यानंतर बोलताना हार्दिक पांड्याने आपल्या सहकाऱ्यांना इशाराच दिला आहे. त्याने सांगितलं की "खरं सांगायचं तर, आम्ही ज्या स्थितीत होतो ते पाहता सामना इतका अटीतटीचा होणं कौतुकास्पद नाही. या सामन्यात आम्हाला बरंच काही शिकण्यासारखं होतं. हेच तर या खेळाचं वैशिष्ट्य आहे. जोपर्यंत हा संपत नाही तोवर तो संपला असं म्हणू शकत नाही".

"त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा चर्चा करु. मला वाटतं मधल्या फळीत आम्ही काही जोखीम पत्करु शकतो. आम्ही जोखीम पत्करुन मधील ओव्हर्समध्ये चांगले फटके खेळण्याची गरज आहे. जेणेकरुन सामना इतका अटीतटीचा होणार नाही याची खात्री बाळगता येईल," असंही हार्दिक पांड्याने सांगितलं आहे.